अलिबाग तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पाॅझिटीव्ह, मुंबईतून रामराज बोरघर येथे आलेल्या तिघांना कोरोनाची लागण - महाराष्ट्र 24 आवाज

अलिबाग तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पाॅझिटीव्ह 


 मुंबईतून रामराज बोरघर येथे आलेल्या तिघांना कोरोनाची लागण 


महाराष्ट्र 24 आवाज 


प्रतिनिधी- जयप्रकाश पवार 


रामराज बोरघर (अलिबाग) : अलिबाग तालुक्यात गुरुवारी (21 मे) तीन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मुंबईतून रामराज बोरघर येथे आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांची कोव्हीड 19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या 8 झाली आहे. 


मुंबईतील कांदीवली येथून पती, पत्नी आणि दोन मुले असे चार जणांचे कुटुंब 17 मे रोजी रामराज बोरघर येथे आले होते. मात्र यातील कुटुंबप्रमुखासह पत्नी व मुलीला त्रास जाणवू लागल्याने त्यांना 18 मे रोजी अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 मे ला या कुटुंबाचे स्वॅब घेऊन ते जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचे रिपोर्ट 20 मे रोजी प्राप्त झाले असून 44 वर्षीय पती, 34 वर्षीय पत्नी आणि 13 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दोन वर्षाच्या मुलाची टेस्ट नेगेटीव्ह आल्याची माहिती डॉ. अभिजीत घासे यांनी दिली. या तिघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.दरम्यान, अलिबागमधील एकूण बाधित रुग्णांची संख्या 8 झाली असून, यापैकी 3 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत एकूण चार पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image