शेवटी त्या 26 मजुरांना होमकॉरंटाईन करणाऱ्या नोडल अधिकाऱ्याची दमदाटी
त्या 26 मजुरांची जेवणाची व्यवस्था करणार कोण?
रायपूर वरुण उपाशीपोटी आलेले ते मजूर होते उपाशीच..
महाराष्ट्र 24 आवाज- जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अंजनगाव सुर्जी:- छत्तीसगड रायपूर येथून अंजनगाव सुर्जी क्षेत्रात दाखल झालेले ते 26 मजूर सतत प्रवासामुळे उपाशी होते. लॉकडाऊन मुळे रस्त्यावर कोणतेही हॉटेल नास्त्याचे दुकाने उघडी नसल्याने काही न खाताच ते थेट अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. शहरातील तपासणी करिता नियुक्त ड्रा. काळमेघ यांनी त्या मजुरांची पाहणी केली व त्याने जवळ असणारे छत्तीसगड राज्य शासनाने 28 दिवसाचे कॉरंटाईन केल्याचे पत्राची पाहणी केली. त्यानंतर तब्बल 6 तास ते मजूर चहा नास्ता जेवण व पाण्याविना त्या ग्रामीण रुग्णालय परीसरात ते होते. त्या काळात कोणताही अधिकारी कर्मचारी त्यांना भेटायला आले नाहीत. महाराष्ट्र 24 आवाज जिल्हा संवाददाता गजानन हुरपडे त्यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांची दैनीय अवस्था पाहून त्यांनी मुख्याधिकारी, नोडल अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी चर्चा केली. त्यानंतर त्या 26 मजुरांची स्कूल कॉरंटाईन केल्याचे समझले. मात्र नप प्रशासनाने त्यांचे व्येवस्थेचे साहित्य शाळा क्र. 7 सुर्जी येथे पोहचती केले. ज्यामुळे पोलीस स्टेशनं जवळ असणाऱ्या शाळा क्र. 5 येथे त्या मजुरांना कोणतीही व्येवस्था नसल्याचे करणा वरुण उपाशीपोटी राहावे लागले. त्या नंतर आरोग्य अधिकारी श्री डोंगरे व नोडल अधिकारी ठेलकर यांनी तपासणी अंती त्या मजुरांना होमकॉरंटाईन करून त्यांचे घरी पाठवल्याचे समझते.
*******************************
लॉक डाऊन पासून ते आता पर्येंत अंजनगाव सुर्जी तालुक्यात कित्तेक आश्रित व कॉरंटाईन केलेले नागरिक शाळां मध्ये ठेवल्या गेले मात्र कोणत्याही कार्यवाहीत प्रशासनाने कोणतीही व्येवस्था केल्याचे निदर्शनास आले नाही. सढळ हाताने दान घेणाऱ्या प्रशासनाने त्या कॉरंटाईन व आश्रित केलेल्यांचा संपूर्ण भार सामाजिक स्वस्थावर लाधला. गोबोगामा अवस्थेत दिसणाऱ्या प्रशासनाने आता पर्येंत अकोला जिल्हातील उगवा येथून आलेले 20 मजूर अहमदनगर येथून आलेले 10 मजूर, वझेगाव अकोला येथील 19 मजूर, माउंट अबू येथील 20 भक्त, कारला येथील आश्रित 20, कापुसतळणी येथील 23 ह्यांचे साठी कोणते पाऊल प्रशासनाने अद्याप तरी घेतलेले दिसत नाही. उलट कारला येथील त्या आश्रित मजुरांना बसस्थानकात ठेऊन कायद्याचा भंग केला. महिला व मुलांसहित चार दिवसापासून कोणतीही व्येवस्था नसतानी त्या बसस्थानकात राहात आहेत. ज्यांची सोय होणे अनिवार्य आहे.
चोराच्या उलट्या बोंबा.... त्या रायपूर येथील सोडलेल्या मजुरांनी माझ्याशी हुज्जद घालणार्यांना का सोडले अशी विचारांना करत त्यांना आत्ताचे आता पुन्हा शाळेत आना असे सांगितल्याचे समझते. मात्र ते 26 लोक फक्त प्रशासनाच्या नाकर्तेपणा मुळे घरी सोडावे लागले हेच सत्य आहे.