तळा तालुक्यातील 27 मजूर उत्तर प्रदेश तर तर 10 मजूर झारखंडला रवाना

 


तळा तालुक्यातील 27 मजूर उत्तर प्रदेश तर 10 मजूर झारखंडला रवाना


महाराष्ट्र 24 आवाज 


तळा प्रतिनिधी- श्रीकांत नांदगावकर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यात वास्तव्यास असणारे उत्तर प्रदेशचे 27 मजूर व झारखंडचे 10 मजूर असे एकूण 37 मजुरांना 15 मे 2020 रोजी तळा तहसील कार्यालयातून सोशल डिस्टन्स पाळत मजुरांना बसणे रवाना करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान योग्य ती काळजी घेण्यात यावी असे मजुरांना सांगण्यात आले तर तालुक्याचे तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या मजुरांची नोंद घेऊन त्यांना जेवण पाणी व सॅनिटायझर दिले तर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी तहसीलदार अण्णप्पा कनशेट्टी, नायब तहसीलदार परमेश्वर खरोडे, तलाठी आदी कर्मचारी उपस्थित होते तब्बल 55 दिवसाच्या कालावधीनंतर हे मजूर आपल्या गावी पोहोचणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स ठेवून या मजुरांना बस मध्ये बसवण्यात आले ती बस पनवेलकडे रवाना झाली असून पनवेलहून चार वाजता उत्तर प्रदेशकडे  विशेष रेल्वेने 27 मजुरांना रवाना करण्यात येणार आहेत तर सायंकाळी सात वाजता पनवेल येथून झारखंड कडे जाणाऱ्या विशेष रेल्वेने झारखंडच्या दहा मजुरांना रवाना करण्यात येणार आहे. तहसिलदार गटविकास अधिकारी , वैद्यकीय अधिकारी ,  पोलिस निरीक्षक, तलाठी व  कर्मचारी वर्ग यांच्या चांगल्या नियोजनामुळे मजूर वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image