माणगाव तालुक्यात सापडला कोरोनाचा पहिला रूग्ण

 


माणगाव तालुक्यात सापडला कोरोनाचा पहिला रूग्ण


गोरेगाव जवळच्या कुशेडे गावात आलेला तरूण निघाला पाॅझिटिव्ह…


 महाराष्ट्र 24 आवाज 


प्रसाद गोरेगांवकर 
(माणगांव तालुका प्रतिनिधी)


आतापर्यंत सुरक्षित राहीलेल्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागात पहीला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती मुंबई येथून नुकतीच आपल्या गावी आली होती. कोरोना लागण झाल्याचे तपासणी अंती सिध्द झाल्या नंतर आता प्रशासन आता आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
१० मे रोजी गोरेगाव शहरा पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुशेडे या गावात काही तरूण मुंबई येथून आले होते. त्या पैकी एक २२ वर्षीय तरुणाला ताप असल्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला लगेचच पनवेल येथील कोवीड रूग्णालयात पाठविण्यात आले. तपासणी अंती या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता कुशेडे सह गोरेगावकरांची झोप उडाली आहे.
माणगाव तहसिलदार प्रियांका अहीरे यांच्या सह गोरेगाव पोलीसांनी गावात भेट देऊन पहाणी करत अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे. संबंधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांना होम क्वाॅरंटाईन करणे तसेच आवश्यक असलेल्या तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image