कोरोनाला गावाबाहेर रोखण्यासाठी तरुणांचा पहारा
श्यामनगर येथील तीन नाक्यांवर प्रवाशांची कसून तपासणी
महाराष्ट्र 24 आवाज
व्यंकट पनाळे - जिल्हा प्रतिनिधी
लातूर - गावभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सुरू केलेल्या अॅंटी कोरोना फोर्समधील तरुण आपापल्या गावांमध्ये सतर्क राहून गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करून त्यांची नोंद ठेवत आहेत.. श्यामनगर, १२ नं. पाटी, बार्शी रोड येथे तीन तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून अँटी कोरोना फोर्सचे जवान कडक पहारा देत आहेत. हे तरुण स्वयंस्फूर्तिने कोरोनाला गावाबाहेर रोखण्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रशासना सोबत काम करीत आहेत. श्यामनगर ग्रामपंचायत याचे नियोजन करत आहे.
कोरोनाविषयी खबरदारीची जाणीव जागृती झाली असून, ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे फोर्समध्ये सहभागी तरुणांमध्ये अनोखा उत्साह संचारला आहे. या फोर्समधील तरुणांसाठी विशेष गणवेश देण्यात आला आहे. तसेच प्रत्येकाला ओळखपत्र दिले आहे. तसेच तपासणी नाक्यावर मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
श्यामनगर येथे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर तीन तपासणी नाक्यावर ३-३ तरुण तीन शिफ्टमध्ये पहारा देत आहेत. सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ६ अशा या शिफ्ट आहेत आणि गावाचे रक्षण करीत आहेत.
एम आय डि सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजिवन मिरकले यांचे मार्गदर्शनाखाली श्यामनगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक लक्षमण मोरे, येथील सरपंच सुरेखा नरेंद्र बनसोडे, उपसरपंच शिवलिंग धुमाळ यांच्या नियोजनानुसार नरेंद्र बनसोडे, रमेश मिठापल्ले, प्रदीप शेवाळे, बालाजी माळी, कमलेश सूर्यवंशी, तुकाराम सावंत, सोमनाथ सूर्यवंशी, विनोद बनसोडे, बालाजी भालेराव, विक्रांत इटकर, आकाश चव्हाण, सूरज इटकर, सुनील बनसोडे, लक्ष्मण चौगुले, हनुमंत गायकवाड, मुकिंदा गोटे, गिडप्पा गायकवाड, दिंगाबार भोसले, बालाजी चौगुले, अजिमोद्दीन शेख, पृथ्वीराज कुरे, भागवत तिगिले, मैनुद्दीन शेख, राहुल सगर, प्रदीप शेवाळे, इरशाद शेख, भागवत कोतवाड, सचिन चौगुले, संदीपान कोडंमगीरे, विजय कांबळे, भीमराव मिठापल्ले आणि संपत शिंदे आदी तरुण मंडळी सामाजिक बांधीलकी ठेवून गावाच्या रक्षणासाठी सैनिका सारखे काम करत आहेत. या सर्व तरुणांचे श्यामनगर येथील सुजान नागरीक कौतूक करीत आहेत.
- व्यंकट पनाळे, पत्रकार
९४२२०७२९४८