तळा तालुक्यासाठी दिलासादायक बातमी, दोघांचेही स्वॅब आले निगेटिव्ह

 


तळा तालुक्यासाठी दिलासादायक बातमी


दोघांचेही स्वॅब आले निगेटिव्ह 


महाराष्ट्र 24 आवाज 


प्रतिनिधी- श्रीकांत नांदगावकर 


तळा तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातले हाय रिस्कमध्ये असलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तळा तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
तळा तालुक्यातील तळेगाव येथील एका 20 वर्षीय तरूणांस कोरोनाची लागण झाली होती त्या तरूणांसोबत मुंबई (धारावी) ते तळेगाव असा त्याची आई व भाऊ यांनी प्रवास केल्याने त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी एम जी एम पनवेल येथे पाठविण्यात आले होते त्या दोघांचेही स्वॅब निगेटिव्ह आले असून कोरोनाची लागण झालेल्या तरूणांची प्रकृती  सुधारते आहे त्यामुळे तळा तालुक्यातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. तळा तालुक्यात गेल्या अडीच महिन्यापासून तहसिलदार श्री  अण्णप्पा कनशेट्टी, नायब तहसिलदार श्री खरोडे व सहकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ अमोल बिरवटकर व सहकारी, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्माताई मुंढे, मुख्याधिकारी माधुरी मडके, सर्व कर्मचारी आणि पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री सुरज गेंगजे व त्यांची टीम अहोरात्र मेहनत करीत असल्यानेच तळा तालुका कोरोनामुक्त होतो आहे. तालुक्यातील सुजाण नागरिकही आपली काळजी घेत असून शारीरिक अंतर ठेवून सर्व व्यवहार करत आहेत. घरी रहा, सुरक्षित रहा , काळजी घ्या व प्रशासनाला सहकार्य करा


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image