तळा तालुक्यातील चरई येथे पुन्हा सापडला कोरोना पाॅझिटीव्ह, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, संख्या पोहचली 7 वर

तळा तालुक्यातील चरई येथे पुन्हा सापडला कोरोना पाॅझिटीव्ह 


 बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह.


संख्या पोहचली 7 वर 


महाराष्ट्र 24 आवाज 


तळा श्रीकांत नांदगावकर


तळा तालुक्यातील चरई बुद्रुक येथील 25 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ७ वर पोहोचली आहे. सदर महिला ही घाटकोपर येथून आपल्या गावी चरई बुद्रुक येथे आली होती. यापूर्वी चरई बुद्रुक येथे आढळून आलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात ही महिला आल्याने तीला क्वाॅरंटाईन करुन तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते व काल रात्री तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले असून बाधित महिला कोणाच्याही संपर्कात आली नसल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


कोरोना हा आजार बरा होत असल्याने कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही पण प्रत्येक नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तळा तालुक्याचे तहसिलदार श्री अण्णप्पा कनशेट्टी व सहकारी, पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री सुरज गेंगजे व पोलिस नगरपंचायतचे कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर्स व पोलिस पाटील यांचे कोरोना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.घरात रहा,सुरक्षित रहा, प्रशासनाला सहकार्य करा.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image