पत्रकार व्यंकट पनाळे यांचे लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना पत्र

पत्रकार व्यंकट पनाळे यांचे लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना पत्र


महाराष्ट्र 24 आवाज 


जिल्हाधिकारी यांना अनावृत पत्र


दि. ०७/०५/२०२०


प्रति.
मा. श्री. जी. श्रीकांत साहेब, जिल्हाधिकारी तथा आयुक्त महानगरपालिका, लातुर
सस्नेह नमस्कार,


साहेब आपण खुपच चांगले काम करीत आहेत.  त्यामुळे सर्वप्रथम आपले हदिऀक हदिऀक अभिनंदन!
लातूरला आल्यापासुन आपण केलेल्या सर्व कार्य कृतत्वाची उजळणी करण्याची या वेळी अवश्यकता वाटत नाही.
आंधळयानी हत्ती पाहुन हत्तीचे वर्णन करावे, आणि हत्ती सुपासारखा,  खांबासारखा, खराट्यासारखा आहे, असे म्हणावे त्याप्रमाणेच ज्याना जसे श्री. जी. श्रीकांत साहेब समजले तसेच हत्तीच्या  दृष्टांता सारखेच ती व्यक्ती आपले वर्णन करत असते.
असो,
मला सध्याच्या " कोरोना " परस्थितीवर कांही मनोगत व्यक्त करावयाचे आहे.
लातूर शहर हे सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहाणारे शहर आहे.  ही कोणाची एकाची मक्तेदारी असलेले शहर नाही. लातूरकरांनी राजकारणात येथे भल्याभल्याना आसमान दाखवले आहे.
अशा या लातुर शहरात कोणी एखादा आधिकारी किंवा लोकप्रतिनिधी जर काम करण्याऐवजी नुसतीच चमकोगिरी करत असेल तर येथील जनता त्याला ओळखुन घेते.
लातुर शहर कोरोनामुक्त शहर आहे,  मात्र लातूर जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा नाही.
लातुर शहर कोरोनामुक्त असल्याचे श्रेय नेमके कोणाचे ?
आणि लातूर जिल्हा कोरोनाग्रस्त हे श्रेय कोणाचे ?
जिल्ह्यातील उदगीरचा करोणाग्रस्तचा आकडा रोजच फुगतो आहे. 
अद्दापपर्यंत तरी लातूर शहरात कोरोना पॉजिटिव्ह व्यक्ती आढळली नाही. तशी व्यक्ती आढळु पण नये.  म्हणुन तसा शोधच घेवू नये असे तर कांही नाही ना ?
माझी एक जागरुक नागरीक म्हणून, एक पत्रकार म्हणून आपणास विनंती आहे . 
आपल्या अव्हानाला प्रतिसाद देवुन जिल्हाभरातील स्वयंसेवी संस्था,  दानशुर व्यक्ति, सामाजिक कार्यकर्ते,  पत्रकार, अॕटी कोरोना फोर्सचे जवान एक योध्दा बनुन सहकार्य करतच आहेत.
लातूर शहरातील सर्वच भागात कोरोना निदान आरोग्य तपासणी सव्हेऀक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे.  स्लम भागात घरोघर जावुन प्रत्येक व्यक्तिची तपासणी केली जावी.  संपूर्ण लातूर शहरात प्रत्येक घरात जावुन ही तपासणी प्रमाणिकपणे होणे गरजेचे आहे.
केवळ कागदोपत्री तपासणी करुन चालणार नाही.
प्रत्येक घरात लॉकडाऊनच्या पूर्वी पासुन रहात असलेले लोक किती ? आणि त्या नंतरच्या कालावधीमध्ये बाहेरुन आलेले लोक किती ?  हा सर्व अहवाल तयार होणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन झालेनंतर शेकडो लोक लातूर शहरात आले असण्याची दाट शक्यता आहे. 
ते शासनाची परवानगी घेवुन असो की गुपचुप असो,  पण आले आहेत हे मात्र खरे आहे.
यात केवळ सामान्य लोकच नाही तर शासकिय सेवेत असलेल्यांचा पण सहभाग असु शकतो. 
मा. साहेब आपले नियोजन चांगले आहे. ते आपण करतच आहात. फक्त घरोघर जावुन सर्वच भागात तपासणी करा. याची सुरुवात स्लम भागापासुन करा .
अजुन घरोघर जावुन तपासणी नाही म्हणून करोणाचे रुग्ण आढळुन येत नाहीत . जेंव्हा तपासणी होईल तेंव्हा वास्तव समोर येईल.  आणि कोरोना महामारीला रोखण्यास व जनतेच्या मनातली भिती कमी करणेस खरे अर्थाने मदत होईल. 
या दृष्टीने आपल्या स्तरावरुन संबंधीत यंत्रणेला आदेश निर्गमित करावेत.
ही विनम्र विनंती.
 
आपला नम्र
- व्यंकट पनाळे, पत्रकार
  ९४२२०७२९४८


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image