औसाचे पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांच्यावर कार्यवाही करावी
औसा डॉक्टर्स असोसिएशनने केली
कारवाईची मागणी..
महाराष्ट्र 24 आवाज
उपसंपादक :--लक्ष्मण कांबळे
औसा पोलीसांनी डॉक्टर ला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी खाजगी डॉक्टर्सना आपले दवाखाने उघडावीत असे आवाहन करीत जर कोणी दवाखाने बंद ठेवली तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तंबी दिली. आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर अहोरात्र या कोरोना बाधित लोकांवर उपचार करीत आहेत. या कोरोनाच्या काळात अनेक लोक या डॉक्टरमध्ये देव पहिला असल्याची कबुलीही देत असतांना आशा देव माणसाला अमानुष मारहाण येथील मुजोर पोलिसांकडून होत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना आरोपिसारखे गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेण्या ऐवजी पोलीस निरीक्षक यांच्या घरी का ? नेले जाते आणि पोलीस निरीक्षक हेही या डॉक्टरला अर्वाच्य भाषा वापरतात यावरून औशातील पोलीस सध्या काय करीत आहे याची कल्पना येते.
याबाबतची हकीकत अशी की,
दि. 30 एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी 6 : 45 वाजता येथील धारशिवे हॉस्पिटलचे डॉक्टर अमर रुद्राप्पा धारशिवे त्यांच्या दवाखानायच्या आवारात थांबले होते. यावेळी कांही पोलिसांनी त्यांना कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांचं म्हणणं न ऐकून घेता त्यांना काठीने अमानुष मारहाण करीत त्यांना फरफटत पोलीस गाडीत बसवले असतांना त्यांचे वडील डॉ. रुद्राप्पा धारशिवे (वय 73 ) यांनीही पोलिसांना तो डॉक्टर आहे आणि माझा मुलगा आहे त्याला मारू नका अशी विनंती केली मात्र या वयोवृद्ध डॉक्टर पित्यालाही पोलिसांनी अर्वाच्य भाषा वापरीत अपमानित केले. डॉ. अमर धारशिवे त्यांना विचारात होते की मी काय गुन्हा केला आहे तरीही पोलिसांनी त्यांना गाडीत डांबून नेले.
डॉक्टरला गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेण्या ऐवजी पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी नेण्यात आले तेथेही डॉ. श्री. धारशिवे यांना पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी अर्वाच्य आणि दमदाटी करीत अपमानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांनी आपल्या निवास्थानाला पोलीस ठाणे बनविले आहे की काय अशी शंका आता लोकांना येत आहे. कायद्याचा आणि पदाचा गैरवापर करून डॉक्टरला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि घरात अर्वाच्य भाषेत दमदाटी करून कायद्याची पायमल्ली केलेल्या पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकुरवर कारवाईची मागणी डॉक्टर असोसिएशन ने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असतांना त्यावर आळा घालण्याऐवजी त्यांना अभय दिले जाते आणि आरोग्यसेवा करणाऱ्या डॉक्टर्स आणि वृत्त संकल करून जनजागृती करणाऱ्या पत्रकारांना मात्र पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे यावर प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कार्यवाही करण्यात यावी अशी असोसिएशन नि मागणी केली आहे