अड्याळ येथे एकमेकांवर 2 वर्षांपासून जीवापाड प्रेम करणाऱ्या आंतरजातीय प्रेमी युगलाचा तंटामुक्त समितीच्या वतीने विवाह संपन्न
महाराष्ट्र 24 आवाज
संजीव भांबोरे (उपसंपादक )
भंडारा ज़िल्हात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे दिनांक 1मे 2020 ला दुपारी 4 वाजेच्या सुमारास एकमेकांनवर 2 वर्षांपासून जीवापाड प्रेम करणाऱ्या आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह अभिषेक वामन देशमुख वय 21 रा. भाटपुरी वॉर्ड क्र. 2 मु अड्याळ ता. पवनी व पायल रवींद्र ढोक वय 19 रा. नेरला ता. पवनी यांचा आंतरजातीय विवाह भाटपुरी वार्ड क्र. 2 येथे मुलाच्या निवासस्थानी अड्याळ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच मुन्ना बोदलकर यांच्या पुढाकाराने पार पडले. यावेळी अड्याळ येथील सरपंच सौ. जयश्री कुंभलकर, मंगेश कुंभारे ग्रा. प सदस्य, वैशाली देशमुख ग्रा. प. सदस्य उपस्थित होते. या प्रेमी युगलांनी स्वमर्जीने लग्न करीत असल्याचे अड्याळ पोलीस स्टेशनला लेखी बयान दिले.