लातुरात सोशल डिस्टन्सिंगचे आता वाजले कि बारा
मार्केट यार्ड व दारू दुकाना समोर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- व्यंकट पनाळे
लातूर : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊन ३.० च्या पहिल्याच दिवशी सरकारने लोकांसाठी लॉकडाऊन शिथिल केले. शिवाय दारू दुकानेही सुरू केली. मात्र ४५ दिवसांपासून घरात कोडुंन असलेल्या लोकांनी आज रस्त्यावर, मार्केट यार्ड येथे आणि दारू दुकानासमोर लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे आता वाजले कि बारा म्हणन्याचिच वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊन २.० च्या अखेरच्या दिवशी सरकारने लॉकडाऊन ३.० मध्ये रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार कोणत्या जिल्ह्यात काय सुरु होणार आणि कशावर बंदी असणार आहे. याबद्दल लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सवलती बाबतची नियमावली सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमातून ज़ाहीर केली होती. मात्र आज ४ मे रोजी हजारोंच्या संख्यने लोक घराबाहेर पडले. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तर सर्वाधिक गर्दी दिसून आली. शिवाय दारू विक्रीच्या सर्व दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंग चे उल्लंघन करीत लोकांनी रांगा लावल्या होत्या. तसेच या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या रांगामधील मद्यप्रेमी कोरोनाला पार विसरून गेले होते. रस्त्यावरून वाहतूक वर्दळ वाढली आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाची पुरती दमछाक होताना दिसत आहे.
या बेकाबू गर्दी आणि सामाजिक अंतर न पाळले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाढत्या गर्दीला सामाजिक अंतराच्या नियमात आणि नियंत्रणात कसे आणायचे, हे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे टाकले आहे.
- व्यंकट पनाळे, पत्रकार
९४२२०७२९४८