मुंबईहून येणाऱ्या पंधरा व्यक्तीला शिरवळ जिल्हा चेक पोस्ट तपासणी करून केले होम क्वारंटाईन

 


मुंबईहून येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोना ची भीती..


 


महाराष्ट्र 24 आवाज 


प्रतिनिधी- सागर पाटील 


सातारा:कोरोना रोगाचा प्रादुर्भाव दीवसे दिवस वाढत आहे. पुणे मुंबई येथे अडकलेल मजूर व इतर भीतीमुळे प्रत्येक कुटुंब प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वगृही परतत आहे. त्यामध्ये गंभीर बाब म्हणजे अनेक व्यक्ती ह्या शासकीय परवानगी शिवाय घराकडे येत आहे. असे कुटुंब किंवा व्यक्ती ह्या कोणत्याही प्रकारच्या आरोग्य तपासण्या न करता गावाकडे येत असल्यामुळे ग्रामीण भागात कोरोना चा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.


  असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यातील शिवरळ चेक पोस्ट वरती तपासणी करतात एका माल वाहतूक करणाऱ्या वाहनात मुंबईवरून पुरुष व महिला असे एकूण 15 व्यक्ती त्या वाहनात आढळले. त्यांच्याकडे घराकडे येण्यासाठी कोणतीही शासकीय परवानगी नव्हती. शिवाय त्यांनी कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी केली नव्हती. या प्रकारची माहिती आमचे प्रतिनिधी सागर पाटील यांना मिळताच त्यांनी स्थानिक आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना भ्रमणध्वनी दारे संपर्क करून सदर कुटुंबातील 


व्यक्तींना स्थानिक पोस्टवर आरोग्य तपासणी करून त्यांना पाटण तालुक्यातील मराठवाडी ह्या त्यांच्या गावी वाहनाने सोडून त्यांना त्यांच्या घरी होम क्वॉरानटाईन करण्यात आले.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image