कोरोनापासून दूर राहण्यासाठी सामाजिक सुरक्षितता हाच यशस्वी उपाय--डॉ. महेंद्र म्हात्रे

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सामाजिक सुरक्षितता हाच यशस्वी उपाय


--डॉ. महेंद्र म्हात्रे


रोहे,दि.१९(समिर बामगडे)


आजकाल कोविड -१९ म्हणून ओळखला जाणारा आजार फ्लूसारखाच दिसतो आहे. ताप, खोकला आणि धाप लागणे ही मुख्य लक्षणे आहेत.आजारी लोकांपासून दूर राहण्यासाठी 


सामाजिक सुरक्षितता पाळणे हाच खरा उपाय असल्या बाबतची माहिती रोहे तालुक्यातील खांब येथील डॉ. महेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.


            डॉ. महेंद्र म्हात्रे यांच्या क्लिनिकमध्ये दिवसभरात विविध आजारांचे रूग्ण उपचारासाठी येत असतात. येणाऱ्या रूग्णांवर उपचार करुन वाढत चाललेल्या कोरोना आजाराविषयीही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करीत असतात.यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता कोरोना आजाराविषयी घ्यावयाची काळजी याबाबत अधिक माहिती सांगताना डॉ. म्हात्रे यांनी प्रयत्न करा आपण स्वत: आजारी असाल तर इतरांपासून दूरच राहा, रुमालात किंवा आपल्या बाहीमध्ये खोका, शिंका. रुमाल कपडे वरचेवर बदला, स्वच्छ ठेवा.आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा.आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा. आजारी असलेल्या लोकांशी जवळचा १ मीटरच्या आतला संपर्क टाळा.आपण स्वत:च आजारी असलात तर घरीच राहा.


खोकताना किंवा शिंकताना रुमालाने, टिश्यूने तोंड झाकून मग तो टिश्यू कचरापेटीत टाका. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा.हे सर्व करीत असताना सामाजिक सुरक्षिततेला विशेष प्राधान्य द्या असे शेवटी त्यांनी सांगितले.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image