दारूचे दुकाने खुले करून सरकार गरीबांच्या घरावर केंढा ठेवत आहे.- भाग्यश्री कांबळे

 


दारूचे दुकाने खुले करून सरकार गरिबांच्या घरावर केंढा ठेवत आहे


महाराष्ट्र 24 आवाज 


उपसंपादक- लक्ष्मण कांबळे 
औसा
सरकारने दारूचे दुकाने  बंद ठेवावेत 
तक्षशिला महिला बचत गटांच्या अध्यक्ष :-- भाग्यश्री कांबळे


सध्याच्या परिस्थितीत सरकार ही  परेशान आहे 
कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा सामना  करण्यासाठी  संपूर्ण भारतात लॉक डाऊन केले आहे सरकारकडून आलेल्या आदेशाचे पालन जनता काटेकोरपणे करत असताना पहावयास मिळत आहे  तरी पण कोविड 19 या रुग्णाची सांख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच आहे गेल्या दीड महिन्यापासून गोरगरीब व मजूर शेत मजूर बांधकाम मजूर व हातावर पोट असणारे असे अनेक मजूर  लॉक डाऊन मुळे  हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे शासनाने माध्यनत्रीच्या काळात दारू दुकाने बार ऍन्ड तंबाकू जन्य पदार्थावर निर्बंध घातले होते पण दिनांक 4 मे 2020 रोजी दारू दुकाने खुले करणार असे जाहीर करताच तळीरामनी  दुकानाच्या समोर रांगा च रांगा लागल्याचे चित्र ठीक ठिकाणी पहावयास मिळले  शासनाला विनंती आहे की सध्या दारू पिऊन येऊन महिलांना त्रास देणाऱ्याचे प्रमाण लॉक डाउन च्या काळात कमी झाले होते 
दारू दुकाने सुरू केल्यानंतर स्त्रियांना  पुन्हां त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येऊनये म्हणून शासनाने  किमान कोरोना व लॉक डाऊन संपेपर्यंत व परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तरी दारू दुकाने बंद ठेवावेत  आम्हा स्त्रियांचा शासनाने विचार करावा अशी एक नागरिक म्हणू विनंती करतेय
शेवटी निर्णय हा शासणाचाच असेल
【आम्हा स्त्रियांना कोरोना पेक्षाही जास्त  दारूपिणाऱ्याचा त्रास जास्त आहे सुखी संसाराला दुःखाच्या खाईत सरकारने ढकलून देण्याचा प्रयत्न करू नयेत】असे तक्षशिला महिला बचत गटांच्या अध्यक्ष भाग्यश्री कांबळे यांनी सांगितले .


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image