महाड तालुक्यातील शेलटोली गावामध्ये आढळला पाॅझीटीव्ह रूग्ण

 


महाड तालुक्यातील शेलटोली गावांमध्ये आढळला पॉझीटीव्ह रुग्ण


महाराष्ट्र 24 आवाज 
   महाड (योगेश भामरे ) महाड तालुक्यातील बिरवाडी पाठोपाठ ग्रुप ग्रामपंचायत सवाणे ग्रामपंचायतीमधील शेलटोळी गावांमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय परप्रांतीय कामगाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत वीस वर्षीय परप्रांतीय कामगार ठेका पद्धतीवर काम करीत होता. त्याची प्रकृती बिघडल्याने 30 एप्रिल 2020 रोजी त्याला महाड ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीकरिता मुंबई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवार 6 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार यांचा वैद्यकीय अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे .


या घटनेनंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी बिरवाडी बाजारपेठेमधील सर्व दुकाने तात्काळ बंद करण्याच्या सूचना देऊन नागरिकांनी घरातच थांबावे यांचे आव्हान केले आहे. या परप्रांतीय तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागामार्फत सुरू असून जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रुप ग्रामपंचायत सवाणे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे महाड औद्योगिक वस्तीमधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच नियमांचे पालन करून स्वतः घरामध्ये सुरक्षित रहावे असे कळविण्यात आले आहे . या घटनेनंतर महाड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोनवर पोहोचली आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image