वाहन चालकां विरुद्ध पोलीस व नप प्रशासनाची दंडात्मक कार्यवाही
45 वाहन चालकांवर केली दंडात्मक कार्यवाही......
संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर आकारला दंड
महाराष्ट्र 24 आवाज
अंजनगाव सुर्जी- जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
अमरावती येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. जिल्हा व स्थानिक प्रशासन निरनिराळ्या कायदेशीर कार्यवाहीतुन गर्दी होणार नाही. लोक घराचे बाहेर निघू नयेत ह्यासाठी उपाय योजना राबवित आहे. ज्या शहरातील नागरिकांना ह्या महामारी साठी अत्यावश्यक असून त्यामुळेच आपले शहर निरोगी राहण्यास मद्दत होणार आहे. प्रशासनाने विभागीय अधिकारी दर्यापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार टुव्हीलर वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करून सुमारे 45 वाहन चालकांना दंड आकारला. पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचे संयुक्त ह्या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणात दंड वसुल झाला असून ह्या कार्यवाही मुळे वाहन चालकांन मध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील गर्दीवर दिसून येत असून गर्दीचे प्रमाण आज कमी असल्याचे जाणवले.
ह्या बाबद ठाणेदार श्री राठोड साहेब यांचेशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की नागरिकांनी स्वतः प्रशासनाची मदत करणे गरजेचे आहे. आपल्या जिल्हातील वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांनी. आता सर्वाधिक सतर्क असणे गरजेचे आहे. कोणीही नियमाचे उल्लंघन करू नका आम्ही विनाकारण शिक्षा करणार नाही. मात्र नियम तोडल्यास शिक्षा ही भोगाविच लागणार कारण त्यात संपूर्ण गावाचे हीत आहे.