म.जी.प्रा.चे पाणी पेटणार, नौगज्जी परिसरात पाणी मिळत नसल्याचे आरोपावरून गदारोळ

म.जी.प्रा. चे पाणी पेटणार, 
नौगज्जी परिसरात पाणी मिळत नसल्याचे आरोपावरून गदारोळ



रात्री दोन वाजता मजीप्रावर नागरिकांची धाव..... 
मला तक्कारच प्राप्त झाली नाही आमदार वानखडे..... 
त्या भागातील नगरसेवकाना न  सांगता सचिन जायदे व सचिन गावंडे यांचे कडे नागरिकांची धाव


महाराष्ट्र 24 आवाज 


जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे 


अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा नौगाज्जी भागात पाणी मिळत नसल्याने त्या भागातील नागरिकांनी म.जी.प्रा. विरुद्ध एल्गार पुकारला असून मजीप्रा चे पाणी पेटणार असल्याचे समझते. 
 म.जी.प्रा. मार्फत गेल्या काही दिवसा पासून शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन व्यवस्थित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या मध्ये नौगज्जी भागातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये वॉल दासविण्यात आला ज्या मुळे बाकी ठिकाणी पाण्याची व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत झाली असून काही भागात पाणी पोहचत नसल्याचे समझते. अशात पाईप लाईन मधून व्यवस्थित पाणी जात आहे मात्र काही नागरिक आपले पाणी लवकरात लवकर पूर्ण व्हावे ह्या मानसिकते मुळे मोटर पम्प लावून पाणी भरतात. अशात ज्यांचे घरी मोटर व्येवस्था नाही अशांना पाणी मिळत नाही. त्याच प्रमाणे काहींनी पाणी मिळत नाही म्हणू जमिनीत खोल खड्डे करून मोटर पम्प लावून पाणी घेण्याचा सपाटा लावला आहे. खोलगट भागात जाणारी पाईप लाईन असल्यामुळे उंचावर पाणी पोहचणे शक्य होत नाही. अशात उन्हाळा असल्यामुळे व लॉकडाऊन काळात सर्व घरीच असतात ज्यामुळे पाणी ज्यास्त पाहिजे. मात्र कित्तेक तक्कारी देऊनही म.जी.प्रा. तर्फे कोणतेही योग्य उपाय योजना केल्या नसल्याने पाण्याचा प्रश्न ऐराणी आला आहे. म.जी.प्रा. ने पाणी सोडण्याची निश्चित वेळ देखील सांगितली नसल्याने कधीही व कुणीही वॉल सुरु बंद करीत असल्याने सामान्य जनतेला पाणी मिळत नाही. त्यात विशिष्ट गावात पाणी मुबलक मिळावे म्हणून 22 चे 9 केल्याची देखील जोरदार चर्चा  शहरातील मुख्य विषय बनला आहे. त्यात म.जी.प्रा. चे व्येवस्थापन अधिकारी व कर्मचारी चालवत नसून ठेकेदार चालवित असल्यामुळे शहरात समस्या वाढत असल्याचा आरोप देखील केल्या जात आहे.  ज्यासाठी सचिन गावंडे तालुका अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन समिती, सचिन जायदे नगर सेवक, अब्दुल अजीज, समी खान तालुका उपाध्यक्ष अ.भा.भ्र. नि. समिती, मो जाकिर शहर उपाध्यक्ष अ.भा.भ्र.नि. समिती, सतीश शिरोळे, बुरहानोदिन, मो आरिफ, मो इरफान, मोहसीन राना, अब्दुल मजीद, मो वसीम घागर आंदोलन करणार असल्याचे समझते. 
********************************
शहानुर धरणात यावर्षी मुबलक पाणी आहे. पुढे दोन महिन्यानंतर पावसाची सुरवात होणार आहे. अशात मुबलक पाणी पुरवठा केल्यास काय हरकत. पाणी नसल्याने एका दिवस आड पाणी सोडल्या जात होते. मात्र देशात चाललेल्या महामारी कडे पाहता व रमजान महिन्याचा विचार करता दररोज पाणी पुरवठा केल्या जावा. 
सचिनभाऊ गावंडे 
तालुका अध्येक्ष अ.भा.भ्र.नी.समिती 
अंजनगाव सुर्जी 
********************************
काही दिवसानंतर नगर परिषद मार्फत निर्माण केल्या जाणाऱ्या टाकी मुळे सर्व समस्येचे निवारण निश्चितच होणार आहे. त्यासाठी नगरांध्येक्ष कमलकांत लाडोळे स्वतः लक्ष देत आहेत. मात्र पाईप लाईन व पाणी पुरवठा योग्य करण्याची प्रक्रिया म.जी.प्रा. ने पूर्ण करून घ्यावी. आंदोलन होण्यापूर्वी जनतेच्या समस्या सोडवाव्या. 
सचिनभाऊ जायदे 
नगरसेवक व बांधकाम सभापती 
नगर परिषद अंजनगाव सुर्जी


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image