तळा तालुक्यातील निगुडशेत येथे सापडला कोरोना पाॅझिटीव्ह , प्रकृती स्थिर
रूग्ण संख्या पोहोचली सहा वर
महाराष्ट्र 24 आवाज
(तळा- श्रीकांत नांदगावकर)
तळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला असून तालुक्यातील मौजे निगुडशेत येथे कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे तळावासीयांचा काळजाचा ठोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कुटुंब घाटकोपर (पंतनगर)येथून दि. 17 रोजी ट्रॅव्हल्सने प्रवास करून 18 रोजी पहाटे तीन वाजता निगुडशेत गावी आले होते. सदर कुटुंबाला रा जि.प शाळेत काँरन्टाईन करण्यात आले होते. त्यातील एका 35 वर्षीय व्यक्तीस सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे 23 रोजी तपासणीसाठी पाठिवण्यात आले असता सदर व्यक्ती कोव्हिड- 19 पाॅझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट 25 रोजी प्राप्त झाला आहे. सदर व्यक्तीच्या समवेत कुटुंबातील आठ जण असून प्राथमिक शाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सिल केले आहे.
आज पर्यंत तालुका कोरोना मुक्त स्वरूपात रहाण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करण्यात महसूल अधिकारी ,पोलीस प्रशासन, नगरपंचायत , शिक्षक, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गाव अध्यक्ष ,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अहोरात्र मेहनत घेऊन दोन महीने काम करीत असताना मुंबईतून मात्र कोरोनाचा प्रसार होत आहे हे वास्तववादी चित्र स्पष्ट दिसत आहेे. घरात रहा,सुरक्षित रहा.