लॉकडाऊन व जनता कर्फ्यू मध्ये लाखो रुपयाची रेती चोरणाऱ्या तस्करांना अभय कोणाचे?
महाराष्ट्र 24 आवाज
अमरावती-प्रतिनिधी- राजेंद्र वाटाने
कोरोना विषाणू धास्ती मध्ये संपूर्ण भारत देश लॉक डाऊन आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे, परंतु अचलपूर तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या असदपूर या नदीकाठच्या गावांमधून गेली दोन ते अडीच महिन्यापासून ट्राली, ट्रॅक्टर अंधाऱ्या रात्रीच फायदा घेत दिवस-रात्र नदीपात्राचे उत्खनन करून कोटी रुपयांचा चुना शासनाला लावत आहेत या रेती तस्करांना अभय कोणाचे पुलिसांचे की महसूल प्रशासनाचे ? ? शासन प्रशासनाची भीती यांना नाही का ?? असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिवस-रात्र राजरोसपणे अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असदपूर या गावांमधून रीतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. मा शैलेश नवाल जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू लावून सुद्धा गावोगावी गस्तीवर असलेले चेक पोस्ट यांना न जुमानता असदपूर ते साखरी या गावांमधून दिनांक 10/5/ 2020 शनिवार रोजी अमरावती जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावून सुद्धा रेतीची रात्रभर तस्करी सुरू होती,या अवैद्य वाहतुकीमुळे असदपूर गावाच्या रस्त्याची मोठी दैना अवस्था झाली आहे, भविष्यात घडणारे अपघात याला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह उत्पन्न होत आहे? या परिसरात काही रस्त्याची तर अक्षरशा वाट लागली आहे. ओव्हरलोड बेजबाबदार, चालणाऱ्या या वाहतुकी पासून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.एखाद्या निष्पाप वेक्तीचा बडी केव्हा पण जाऊ शकतो, नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात भीतीचे वातावरण असून अशा संचारबंदी च्या काळामध्ये येवद्यरित्या रेतीची तस्करी होत आहे. ती कोणाच्या आशीर्वादाने पोलिस प्रशासनाच्या की महसूल प्रशासनाच्या अद्याप पर्यंत बर्याच बातम्या प्रकाशित झाल्या तरी या रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्यात प्रशासन अयशस्वी ठरले आहे, या सत्याला नाकारता येत नाहीं.