माणगावमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण
कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव
महाराष्ट्र 24 आवाज
माणगाव- प्रतिनिधी- अशोक कासे
देशभरासह राज्यात आज अडीच ते तीन महिन्यापासुन कोरोना वादऴ घोंघावत होते मात्र दक्षिण रायगड मध्ये असणारा माणगांव तालुक्यात अद्यापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नव्हता मात्र आज दिनांक 10 मे रोजी एक 63 वर्षीय वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे सदरील रुग्ण मुऴगांव कोकरे ता. महाड येथील असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीला दम्याचा आजार असल्यानं त्याला माणगांव रेल्वे स्टेशन जवऴ असणाऱ्या राठोड हार्ट केअर रुग्णालयात 5 मे पासुन दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या रुग्णाला घशाचा त्रास जाणवत होता. पेशंटच्या आरोग्यात सुधारणा देखील होती डाँ सुवर्णा राठोड यांनी दक्षता घेत सदर पेशंट चा स्वँब रिपोर्ट घेतला असता तो रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला आहे दरम्यान माणगांव शहर आज सील होण्याची कारवाईची चिन्हे दिसत आहेत.