प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या रायगड जिल्हा संघटकपदी दैनिक रायगड टाईम्स चे पत्रकार श्री हरिश्चंद्र महाडिक यांची निवड
महाराष्ट्र 24 आवाज
रायगड -उपसंपादक- समीर बामुगडे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या रायगड जिल्हा संघटकपदी दैनिक रायगड टाईम्स, दैनिक सागर, दैनिक नवराष्ट्र व दैनिक कृषीवलचे पत्रकार श्री हरिश्चंद्र मारूती महाडिक यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकार हरिश्चंद्र महाडिक हे गेल्या 35 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यांना आजपर्यंत 42 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोकण सम्राट पुस्तक, आनंद नगरी हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. विविध विषयांवर 20 लेख प्रकाशित झाले असून फुंकर हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी दूरदर्शनवरील स्वयंप्रभा या मालिकेत पत्रकारांची भूमिका साकारली आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी, पत्रकार सदस्य,यरळ ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती पत्रकार सदस्य या पदावरही विशेष कार्य करीत आहेत. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवाचा विचार व विशेष उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहिर करण्यात येत आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
आंबेगावे डी. टी.
संस्थापक अध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य
मो.9270559092 / 7499177411