आत्मनिर्भर भारत संकल्प निधी वितरणात एकल महिला व आपंगाना समाविष्ट करा.
-----------------------------
श्रमिक क्रांतीची पंतप्रधानांनकडे मागणी
महाराष्ट्र 24 आवाज
प्रतिनिधी- ओमकार टाले
कोरोना महामारीचे संकट संपुर्ण देशाला प्रभावित केले आसुन सामाजिक आंतराच्या परिणामामुळे देशातील सर्व उद्योग,धंदे,बंद पडुन देशाची स्थिती काही प्रमाण अडचणीत आली आहे,ही स्थिती सुधारणेसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेद्र मोदीजीने वीस लाख करोड़ रुपयेचा आत्मनिर्भर भारत संकल्प निधीचे पॅकेज देशाला देण्याची घोषणा दि.12/5/2020 या दिवशी केले आसून हा निधी कुठल्या क्षेत्रात कीती उपयोगात आणले जाईल याची माहीती केंद्रीय आर्थ मंत्री निर्मला सितारमण यांनी दिली आहे,या फंडात 1) वीज वितरण कंपनीला नव्वद हजार करोड रुपये मदत
2) लहान उद्योचकाना वीस हजार करोडची मदत
3) कारखाने मालकाना भरीव आर्थिक मदत
4) उद्योजकाना पुर्वी कर्ज परतफेड केले नसले तरीही कर्ज.आशा अनेक नियोजनाचा या संकल्प निधीमध्ये समावेश करण्यात आला आहे, मात्र या निधीमध्ये अतिशय संकटात जगणार्या एकल महिला,आपंंग व असंघटित कामगाराचा विचार करण्यात आला नाही व यांच्या कल्याणा साठीच्या तरतुदी यामध्ये ठेवण्यात आल्या नसल्याने श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र,व महाराष्ट्र दलित हक्क समितिच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे,तसे दि. 16/5/2020 रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे,कोरोना महा मारीच्या संकटामुळे प्रत्यक्ष एकल महिला,मजुर,व आपंगाना वनवास भोगावे लागत आसुन यांची उपासमार होत आहे,यांच्या बाबद सरकार गार्भियाने विचार का करीत नाही,आसा सवाल ही प्रसिद्धी पत्रकात मांडण्यात आला आहे,यांची उपासमार थांबवण्यासाठी काही सामाजिक संस्था, संघटना,कर्मचारी,व काही कार्यकर्ते धान्याचे किट्स देऊन एकल महिला,आपंग,यांची उपासमार थांबवण्याची शिकस्त करीत आहेत हे उघड्या डोळ्यांने पाहुन सुध्दा सरकार कडुन या या वीस लाख करोड च्या पॅकेज मध्ये यांच्या साठी काहीही तरदुदी केल्याचे दिसुन येत नाही आसे वक्तवे पत्रकाद्वारे नमुद करुन संघटनेकडुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे,मजुरसाठी सुध्दा कायम स्वरूपी कल्याण होईल आशा तरतुदी करण्यात आल्या नाहीत निराधार, आपंग,व मजुर यांचा सर्वांगीण विकास झाल्या शिवाय आत्मनिर्भर भारत निर्मितीचे व स्वप्न पुर्ण होणार म्हणून या निधी पॅकेजचा भाग राज्याला देत आसताना तरी एकल महिला,आपंग,व मजुरांचा विचार करुन त्यांना राज्याकडुन भरीव मदत देण्यात यावी आशी मागणी संघटनेच्या वतीने पत्रकाद्वारे केली आहे,वारंवार मजुरांच्या व्यथा मांडुन सुध्दा सरकार कडुन दुर्लक्ष केले जात आहे आशी ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे,1) या निधी आर्तंगत एकल महिला,मजुर,आपंग याना प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान घोषित करुन त्याची कडक आमलबजावणी करण्यात यावी,2)यांचे बँक खातेवर दरमाह तिन हजार रुपये जमा करण्यात यावे,3) गाव तिथे रोजगार हमीची कामे चालु करण्यात यावे4) ग्रामीण,शहरी मजुर महिलांचे विविध कंपनी व मायक्रो फायनान्स कडुन घेण्यात आलेली कर्ज माफ करण्यात यावे आशी मागणी संघटनेचे आध्यक्ष मारुती गुंडीले,लक्ष्मण रणदिवे,गोविंद शिंदे,बालाजी आदावळे, राजकुमार सुर्यवंशी, किरण जाधव,गौरव गुंडीले,आर्चनाताई तोगरे इत्यादीनी निवेदनाद्वारे केली आहे.