काळप्रकल्प अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे माणगाव तालुक्यांतील शेती सुकली, ग्रामस्थांचा अधिकारींना घेराव.
२४ तासात पाणी न आल्यास उसरघर ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा.
महाराष्ट्र 24 आवाज
माणगाव- प्रतिनिधी- प्रसाद गोरेगावकर
कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूचा सामना करत असताना शेतकऱ्यांना उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे असं असताना मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यांतील शेतकरी अजूनच संकटात सापडला आहे गेल्या पंचवीस दिवसापासून उसरघर गावातील शेतीला पाणी पोचत नाही अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता गळती असल्याने गुरुळ गेले आहेत त्याठिकाणी काम चालू असून लवकरच पाणी दिल जाईल, कामगार रजेवर आहेत, अधिकारी गावी गेले आहेत अशी कारणे सांगितली जात असल्याने उसरघर ग्रामस्थांनी अखेर स्थानिक पाठबंधारे विभागाच्या अधिकारींना घेराव घालत आपला उद्रेक बाहेर काढून २४ तासात शेतीला पाणी न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शासनाला दिला असून झालेल्या शेतीच्या नुकसानाला लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली असून काळप्रकल्प अधिकारी पाणी कमिटीच्या स्थानिक सदस्यांना देखील मिटींगला न बोललता गौडबंगाल करून कंपन्न्यांनानच पाणी कसे देतां येईल अशी काळजी घेताना दिसत आहेत याविषयी प्रकल्प अधिकारी श्री दाभिरे व श्री भाट व श्री गावित यांच्यासोबत संपर्क केला असतां तिघेही करोनाच्या प्रदुरभावाने गावी असल्याचे सांगून अधिकारी वर्गाचा या निष्काळजी पणामुळे तयार झालेल भाताचे पिक एैन कापणीच्या वेळी पाण्याअभावी सुकल्याने उसरघर ग्रामस्थांनी शेवटच्या टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला यावेळी प्रमोद घोसाळकर यांच्यासह शेकडो उसरघर ग्रामस्थ उपस्थित होते.