पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करावा, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मा मुख्यमंत्री यांचकडे मागणी

 


पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करा. 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे  मागणी 


महाराष्ट्र 24 आवाज 


जिल्हा प्रतिनिधी- अनिल राठोड
यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  (रजि )महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करावा अशी मागणी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व यवतमाळचे पालकमंत्री श्री संजयभाऊ राठोड  यांना ईमेलद्वारे करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार बाधंवाची परिस्थिती ही अत्यंत हालाखीची निर्माण झाली आहे. कोरोना या महामारीमुळे पत्रकारावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. वर्तमानपत्राच्या जाहिराती बंद असल्याने कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य  पत्रकारांना होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पत्रकार हा आपला जीव धोक्यात घालून कोरोनासंदर्भात वार्तांकन करत असून त्यांना कोणत्याही  प्रकारचे विमा कवच लागु नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य धोक्यात आहे अशा समयी शासनाने अद्यापपर्यंत पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे मानधन आणि विमा संरक्षण लागू  केलेले नाही. पत्रकारसुद्धा कोरोना योद्धा आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच त्यामुळे पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण लागू करून पत्रकारांचे मनोधैर्य अधिक बळकट करावे अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यवतमाळ जिल्हा शाखा व विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला यांनी मा मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व यवतमाळचे पालकमंत्री श्री संजयभाऊ राठोड यांना ईमेलद्वारे मागणी केलेली आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image