"गाव तस चांगल पण वेशीला टांगल"
अंजनगाव सुर्जी व्यापारपेठ सुरु करून लहान व्यापाऱ्यांना दिलासा द्या?..ब्रिजमोहन झंवर
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे
दुचाकी वाहनास प्रतिबंध असून वाहनांची यातायात सुरु मग दुकाने बंद का?.....
दारूच्या दुकानाचा विचार करणारे प्रशासन बाकी व्यावसायांचा विचार का करीत नाही?....
कोरोना (केव्हीड 19) च्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण लॉकडाऊन करून किमान 55 दिवसाचा कालावधी झाला असेल. शासनाने वारंवार निर्देशित करून स्थानिक प्रशासनाने आपल्या स्थरावर कारवाही करण्याचे निर्देशित केले. मात्र अंजनगाव सुर्जी स्थानिक प्रशासन जीवनावश्यक वस्तू किराणा व औषधी दुकानाचा विचार करून इतरत्र सर्व व्यवसाय बंद ठेवत आहे. ज्यामुळे कापड, रेडिमेड, इलेक्ट्रिक, इलेकट्रोनिक, उपहार गृह, ऑप्टिकल, ऑटोमोबाईल इत्यादी दुकानदारांवर आर्थिक गाज पडली असून त्या लहान व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडून पडली आहे. सरकारी आर्थिक योजनेत ह्या व्यापारी वर्गाचा विचारच झाला नाही. आमदार, खासदार सारख्या नेत्यांनी देखील ह्या व्यापारी वर्गाच्या आर्थिक अडी-अडचणी विषयी ब्रशब्द काढला नाही. ह्यावरून हेच निश्चित होते की सर्व सामान्य व्यापाऱ्यांना दुकान भाडे, कामगार पगार, इलेक्ट्रिक खर्च, बँकेच्या कर्जाचे व्याज तसेच त्यांचे घराचा खर्च नसतो की काय? आजची परिस्थिती लक्षात घेता सर्व राजकीय पक्ष शेतकरी, गरीब ह्यावरच बोलताना, निवेदने देताना दिसतात ज्यातून हे गरिबांचे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे भासवतात. आज सामान्य व्यापाऱ्यांचा प्रश्न विचाराधीन होणे गरजेचे आहे. गावात काही राजनीतीक नेता वर्ग वाघळता कोणीही व्यापारपेठ सुरु करण्याची पहल करीत नाही. नगरांध्येक्ष कमालकांत लाडोळे, सचिनभाऊ जायदे, सचिनभाऊ गावंडे सारखे स्थानिक जनप्रतिनिधी गजानन हुरपडे, मनोहर मुरकुटे नंदकिशोर पाटील सारखे पत्रकार वगळता कोणीही सामान्य व्यापाऱ्यांची बाजू मांडताना दिसत नाहीत. सर्व व्यापारी वर्गाच्या वतीने सर्व पत्रकार, नगरांध्येक्ष साहेब, आमदार साहेब यांना प्रार्थना की कोणताही विलंब न करता लागलीच व्यापारपेठ सुरु करण्यासाठी सक्षम व योग्य पावले उचलावीत अन्यथा विपरीत परिस्थिती निर्माण होईल.
व्यापारी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून व्यापार करण्यास तय्यार आहेत. फक्त प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा. असे व्यापारी असोसिएशन अध्येक्ष ब्रिजमोहन झंवर यांनी आपल्या बातमी पत्रात सांगितले.
प्रशासनाने कठोर घ्यावयाचे निर्णय....
शहरातील मुख्य व्यापारपेठ मधील वाहनावर बंदी घालावी. ओमचौक, आलचौक, पाणअटाई ह्याभागात बॅरिकेट्स लावून वाहन पूर्णतः प्रतिबंधित करावे ज्यामुळे गर्दी होणार नाही. दुचाकी वाहन पूर्णतः प्रतिबंधित करावे. शानिवारा भागात रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे पाण विक्रेते, फळ विक्रेते, फेरी वाले यांना त्याभागात व्यवसाय करण्यास रोक लावावी.
************************