तळा तालुक्यात सापडला कोरोणा पाॅझिटीव्ह तालुक्याची संख्या पोहचली 13 वर आज जिल्ह्यात 160 नव्या रूग्णांची नोंद जिल्ह्याची रूग्णसंख्या पोहचली 902 वर

तळा तालुक्यात सापडला कोरोणा पाॅझिटीव्ह 


तालुक्याची संख्या पोहचली 13 वर 


आज जिल्ह्यात 160 नव्या रूग्णांची नोंद 


जिल्ह्याची रूग्णसंख्या पोहचली 902 वर


 


महाराष्ट्र 24 आवाज


 


प्रतिनिधी - श्रीकांत नांदगावकर


        तळा,रायगड : दि. 25, तळा तालुक्यातील बारपे येथे 45 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पाॅझिटीव्ह आला असून त्यांना माणगावच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर व्यक्ती मुंबई मालाड येथून दि 17 जून रोजी बारपे येथे आली आहे .4 व्यक्ती संपर्कात आल्याने त्यांनाही क्वाॅरंटाईन केलेले आहे. कोरोनामुक्त झालेला तालुक्यात पुन्हा पाॅझिटीव्ह रूग्ण आढळल्याने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


       स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 887 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 160 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-456, पनवेल ग्रामीण-190, उरण-42, खालापूर-18, कर्जत-42, पेण-37, अलिबाग-50, मुरुड-2, माणगाव-14, तळा-1, रोहा-26, श्रीवर्धन-2, महाड-14, पोलादपूर-8 अशी एकूण 902 झाली आहे.


            कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1090, पनवेल ग्रामीण-292, उरण-186, खालापूर-13, कर्जत-40, पेण-32, अलिबाग-42, मुरुड-17, माणगाव-56, तळा-12, रोहा-25, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-29, महाड-22, पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 887 आहे.       


 


            आज दिवसभरातही पनवेल मनपा-35, पनवेल ग्रामीण-4, उरण-1, कर्जत-3, पेण-4, माणगाव-1 असे एकूण 48 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.


         आतापर्यंत पनवेल मनपा-66, पनवेल ग्रामीण-14, उरण-2, खालापूर-3, कर्जत-6, पेण-1, अलिबाग-6, मुरुड-2, माणगाव-1, तळा-2, श्रीवर्धन-3, म्हसळा-3, महाड-7 पोलादपूर-1 असे एकूण 117 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.


       आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-82, पनवेल (ग्रा)-36, उरण-7, खालापूर-8, कर्जत-7, पेण-4, अलिबाग-9, माणगाव-3, तळा-1, श्रीवर्धन-3 अशा प्रकारे एकूण 160 ने वाढ झाली आहे.


        आजच्या दिवसात 4 व्यक्तींची (पनवेल मनपा-1, खालापूर-1, श्रीवर्धन-1, महाड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.


        आतापर्यंत जिल्ह्यातून 7 हजार 441नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 4 हजार 499 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 36 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 2 हजार 906 आहे.


00000


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image