Covid-19 जनजागृतीपर बालचित्र स्पर्धेचे आयोजन
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पेण व फ्रेंडशीप असोसिएशन (कोकण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
महाराष्ट्र 24 आवाज
प्रतिनिधी- स्वप्निल पाटील
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पेण आणि फ्रेंडशिप असोसिएशन (कोकण) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आंबेगावे डी. टी. यांच्या मार्गदर्शनाखाली
covid - 19 जनजागृती बालचित्र स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे,सदर स्पर्धा दिनांक 1 जूनते दिनांक 8 जून या कालावधीत संपन्न होणार असून या स्पर्धेत 3 वर्ष ते 14 वर्ष वयोगट असणाऱ्या स्पर्धकांना सहभाग घेता येईल.
स्पर्धेचे नियम :
1)स्पर्धा तालुका मर्यादित असल्याने आणि वयाची अट असल्याने स्पर्धकाच्या आधारकार्डचा फोटो पाठविणे बंधनकारक राहील.
2) स्पर्धकाने घरात बसून कोरोनाविषयी जनजागृतीपर संदेश देणारे चित्र काढायचे आहे.
3)चित्र काढून झाल्यानंतर स्पर्धकांनी 8149332338 या व्हाट्सअॅप नंबरवर जनजागृतीपर संदेश देणारा चित्राचा फोटो पाठवायचा आहे.
4) फोटो स्पष्ट आला पाहिजे, त्यामुळे चित्राची क्वालिटी समजण्यास मदत होईल.
5) चित्र पाठविल्यानंतर त्या स्पर्धकाला लगेच त्याचा स्पर्धक नंबर (कोड) दिला जाईल.
6) स्पर्धा पार पडल्यानंतर निकालाची तारीख जाहीर केली जाईल.
7)सदर स्पर्धेतील 3 ते 7 वयोगटातील प्रथम क्रमांक 700,द्वितीय क्रमांक 500 आणि तृतीय क्रमांक 200 तसेच प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी दिली जाईल.तर 8 ते 14 वयोगटातील प्रथम क्रमांक 700 आणि द्वितीय क्रमांक 500 आणि प्रशस्तीपत्रक - ट्रॉफी दिली जाईल.
8)परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धा ठेवण्याचा मूळ उद्देश असा आहे की यातून विद्यार्थ्यांना घरात बसून एक विरंगुळा, चित्र काढण्याची ओढ, स्पर्धेत भाग घेतल्याचा आनंद आणि विशेष म्हणजे कोरोना च्या बाबत जनजागृती होऊ शकते,त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, त्यांच्यातील कलात्मक गुण दाखविण्याची संधी त्यांना देण्यात यावी, स्पर्धा विनामूल्य आहे, आजच सहभागी व्हा, स्पर्धेतील चित्र ज्या दिवशीची तारीख दिली आहे त्या दिवशी पाठवायचे आहे मात्र आपले स्पर्धेतील नाव निश्चित करण्यासाठी त्वरित संपर्क साधावा....
श्री. आंबेगावे डी. टी.( संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष) : 9270559092
अध्यक्ष : दीपक लोके : 9145424647
उपाध्यक्ष : स्वप्नील पाटील 8149333338
सचिव : राजेश कांबळे 9011614959
खजिनदार: किरण बांधनकर 9237305656
सहसचिव: मितेश जाधव 9850759389
सदस्य: गणेश पाटील 8669066971
सदस्य: सुभाष टेम्बे 844640543
सदस्य : योगेश म्हात्रे ( अध्यक्ष, निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन,कोकण)9220464711