भारतीय जनता युवा मोर्च्याचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न नगराध्यक्ष, माजी आमदार यांनी केले रक्तदान शिबिराचे उदघाटन..जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी येणार असल्याची चर्चा

भारतीय जनता युवा मोर्च्याचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न


नगराध्यक्ष, माजी आमदार यांनी केले रक्तदान शिबिराचे उदघाटन.... 


जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी येणार असल्याची चर्चा 


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे



अंजनगाव सुर्जी : कोरोना पार्श्वभूमी वर वाढते संक्रमण ज्यामुळे प्रतिदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. ज्यामुळे रक्ताची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्यासाठी प्रत्येक संघटना, राजकीय पक्ष आपआपले स्तरावरून प्रयत्न करीत असून कोरोना महामारीच्या विरोधात योद्धा म्हणून उभे आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आजपर्यंत झालेल्या रक्तदान शिबिरातून साधारण एक हजार नागरिकांनी रक्तदान केले असल्याची माहिती आहे. आज देखील अंजनगाव सुर्जी शहरात आणि तालुक्यातील शेंडगाव येथे रक्तदान सुरु आहे. शहरातील भाजप व युवा मोर्चा यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित ह्या शिबिरात सदानंद बर्मा रक्तपेढी परतवाडा येथून टीम आली असून डाॅ. बर्मा उपस्थित होते.



रक्तदान शिबिराची सुरवात कमालकांत लाडोळे व माजी आमदार रमेश बुंदिले यांनी केली. ज्यामध्ये नगराध्यक्ष यांनी रक्तदान केले. नगर पालिका उपाध्यक्ष रवींद्र बोडखे, बांधकाम सभापती सचिन जायदे, माजी न.प. उपाध्यक्ष शरद बलंगे, मनोहर भावे, नगर सेविका शिला सांगणे, शुभांगी पाटणकर, तालुका भाजप अध्यक्ष दाळु महाराज, शहर अध्यक्ष जयेश पटेल, नितीन पटेल, हर्षल पायघन, संतोष वर्मा, अविनाशजी देशपांडे, रवी गोळे, आरोग्य सभापती सतीश वानखडे, अविनाश पवार, गजानन लोकरे व प्रतीक गजानन लोकरे या पिता पुत्रांनी सोबतच रक्तदान केले. रक्तदान शिबिरात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहयोग राहील अशी माहिती जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष मेन यांनी दिली. बातमी लिहेपर्येंत भाजप जिल्हा अध्यक्ष ह्या आल्या नव्हत्या मात्र पन्नासचे आसपास रक्तदात्यांनी रक्त दान केले होते.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image