जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकारी निधी चाैधरींनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली केंद्रीय पथकाला माहिती

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकारी निधी चाैधरींनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली केंद्रीय पथकाला माहिती


महाराष्ट्र 24 आवाज 


जिल्हा प्रतिनिधी- योगेश भामरे



अलिबाग,जि.रायगड, दि.16(जिमाका) : जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची आणि झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकातील सदस्य सहसचिव (प्रशासन व सीबीटी), एनडीएमच, एमएचए, नवी दिल्ली श्री.रमेशकुमार गंटा (भाप्रसे), सल्लागार अर्थ मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली श्री.आर.बी.कौल, संचालक, उर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली श्री.एल.आर.एल.के.प्रसाद, उपसचिव, ग्रामीण विकास, नवी दिल्ली श्री.एस.एस.मोदी, संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर श्री.आर.पी.सिंग, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग, मुंबई श्री.तुषार व्यास यांना दिली.



      यावेळी केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सूचना दिल्या की, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घेण्यात यावी. कृषी विभाग,मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईने नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करावा, या अहवालाचा अभ्यास करून हे पथक पुन्हा एकदा जिल्ह्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


      निसर्ग चक्रीवादळाच्या या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली, संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले, त्यात बऱ्याच अंशी यश मिळाले आहे, गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.



      यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रणधीर सोमवंशी, उपायुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन सिद्धराम शालिमठ, मनाेज गाेहाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग, अलिबाग आर.एस. मोरे, कार्यकारी अभियंता,विद्युत महावितरण श्री. पाटील, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खाेपकर, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय श्री.भारती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विशाल दौंडकर, सतिश कदम आदि उपस्थित होते.


 


००००००


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image