शेतकरी-शेतमजुरांना ५० लाख रुपये विमा संरक्षण कवच द्या.
शेतकरी-पत्रकार व्यंकट पनाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- व्यंकट पनाळे
लातूर : दि.११ - कोरोनाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने जर विमा संरक्षणाची गरज कोणाला असेल तर ती शेतकरी आणि शेतमजुरांना अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांनी कष्ट केल्याशिवाय शेतात घाम गाळल्याशिवाय अन्नधान्य पिकणार नाही. देश जगणार नाही, त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुर यांना ५० लाख रुपये विम्याचे संरक्षण कवच देण्यात यावे, अशी मागणी हरंगुळ बु. येथील माजी सरपंच तथा शेतकरी पत्रकार व्यंकट पनाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पनाळे यांनी निवेदनात शेतकऱ्यांनी जर अन्नधान्य नाही पिकवलं तर देशातली जनता उपाशी मरेल. खऱ्या अर्थाने देशाचा पोशिंदा शेतमजूर आणि शेतकरी आहे. सर्वापर्यंत अन्नधान्य पोहोचवणारा शेतकरी आहे. या सर्वांच्या पर्यंत भाजीपाला पोहोचवणारा शेतकरी आहे. सर्वांच्या पर्यंत दूध पोहोचवणारा शेतकरी आहे. आणि या सर्व कामासाठी कष्ट करणारा शेतकरी व शेतमजूर आहे. शेतकरी आणि शेतमजूर आज सर्वार्थाने संकटात आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने आज विम्याच्या संरक्षणाचे कवच हे शेतकरी आणि शेतमजूराला दिले पाहिजे. ती आज खरी गरज आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुर परिवाराला पन्नास लाख रुपयाच्या विम्याचे संरक्षण कवच देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी व्यंकट पनाळे यांनी केली आहे.