सरपंच सेवा संघाच्या भंडारा जिल्हा समन्वयकपदी संजीव भांबोरे यांची निवड

सरपंच सेवा संघाच्या भंडारा जिल्हा समन्वयकपदी संजीव भांबोरे यांची निवड


महाराष्ट्र 24 आवाज 


उपसंपादक - संजीव भांबोरे



भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ तसेच महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ते, आंदोलनकर्ते, उपसंपादक , ज्येष्ठ पत्रकार, आदर्श नागरिक म्हणून नावारूपास आले ले पहेला / अड्याळ भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सह सचिव ,कुशल नेतृत्व, वतृत्व, आंदोलनकारी व 25 वर्षांपासून सामाजिक फुले , शाहू, आंबेडकर चळवळीचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते संजीव मुरारी भांबोरे यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी सरपंच सेवा संघ भंडारा जिल्हा समनव्यक पदी नियुक्ती केलेली आहे.


 आपण जिल्यातील सरपंचांना गावातील विकासाकरिता एकत्रित करून व सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटन जिल्हात मजबूत करणार असल्याचे सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले


सदर निवडीचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा संपादक पंकज वानखेडे, विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, जिल्हा अध्यक्ष देवानंद नंदगवळी, जिला उपाध्यक्ष सुरज गोंडाने, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, प्रदीप लोखंडे, श्रीकांत शहारे, प्रवीण भोंदे, अर्चना लोखंडे, अमोल ठवकर, सेनपाल वासनिक, यांनी अभिनंदन केलेले आहे


Popular posts
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
सौ.अक्षरा कदम दुस-यांदा तळा पंचायत समितीच्या सभापती
Image
पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रातील पैलवानांच्या अग्रणी संस्थेच्या कार्यकारिणीवर पै.अतुल भाऊ जगताप व आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती जाहिर
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image