गझल मंथन साहित्य संस्थेचा चौथा ऑनलाईन मुशायरा दिमाखात संपन्न

गझल मंथन साहित्य संस्थेचा चौथा ऑनलाईन मुशायरा दिमाखात संपन्न


महाराष्ट्र 24 आवाज


प्रतिनिधी - महादेव महाजन


गझल मंथन साहित्य संस्था : नवोदित गझलकरांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी संस्था म्हणून गझल मंथन साहित्य संस्थेची ओळख आहे. गझल मंथन साहित्य संस्था निरनिराळे उपक्रम नेहमी राबवत असते. गझल मंथन साहित्य संस्थेचा चौथा ऑनलाईन गझल मुशायरा छान रितीने पार पडला. ७ जून, २०२० रोजी, दुपारी २ ते ३ या वेळेत ऑनलाईन मुशायरा उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलनानंतर या मुशायऱ्याचे प्रास्तविक गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिल कांबळे सर यांनी सादर केले. या मुशायऱ्याचे अध्यक्षपद आ. डाॅ. मीना सोसे मॅडम यांनी भूषविले. आ. विष्णू जोंधळे सरांनी मुशायऱ्याचे बहारदार सूत्रसंचालन केले. आ. संजय तिडके सर, आ. मृणाल गीते मॅडम, आ. भरत माळी सर, आ. निशा चौसाळकर मॅडम, आ. राजेंद्र घोटकर सर, आ. रेखा ढगे मॅडम, आ. विष्णू जोंधळे सर, आ. डाॅ. मीना सोसे मॅडम या सर्वांनी बहारदार गझला सादर करून मुशायरा यशस्वी केला. गझलकारांनी एकाहून एक उत्कृष्ट गझला सादर केल्यामुळे मुशायरा उत्तरोत्तर रंगात आला. गझलकार आ. डाॅ. कैलास गायकवाड सरांनी मुशायऱ्याला मार्गदर्शन केले. यावेळी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिल कांबळे सर यांच्या तर्फे सर्व प्रमुख पाहुणे तथा सहभागी गझलकार यांचे आभार मानण्यात आले. मुशायऱ्याला भरभरून दाद देऊन मुशायरा यशस्वी केल्याबद्दल सर्व रसिकांचे गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव आ. जयवंत वानखडे सर यांनी आभार मानले. या मुशायऱ्याची तांत्रिक जबाबदारी गझल मंथन साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष आ. देवकुमार सर यांनी पार पाडली. गझल मंथन साहित्य संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी गझल मंथन साहित्य संस्थेच्या सहसचिव आ. उमा पाटील मॅडम यांच्यातर्फे करण्यात आले.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image