चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळा नगरपंचायतीकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळा नगरपंचायतीकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन.


महाराष्ट्र 24 आवाज 


(तळा श्रीकांत नांदगावकर)



प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या पूर्वसूचनेनुसार अरबीसमुद्रात कमी दाबाचापट्टा तयार झाला असून वेगाने वारे वाहणे व अतिवृष्टीची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर तळा नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नगरपंचायतीमार्फत तळा बाजारपेठेतून माईकद्वारे दि २ जूनच्या मध्यरात्रीपासून शहरात जनता कर्फ्यु लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली यांसह नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,कच्या व मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी नगरपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या कुणबी समाज सामाजिक सभागृहात तात्काळ स्थलांतरित व्हावे,स्थलांतर करताना घरातील गाई,गुरे,पाळीव प्राणी यांना देखील सुरक्षित स्थळी हलवावे,शहरातील तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी व पुसाटी या वाड्यांनी विशेष काळजी घ्यावी,नागरिकांनी घरामध्ये पिण्याचे पाणी, टॉर्च,मेणबत्ती ई.वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवावा,वादळामुळे विजेच्या तारा, खांब पडण्याची शक्यता असल्याने अशा वस्तूंपासून लांब रहावे,झाडाखाली वाहने उभी करू नये,प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे नागरिकांनी पालन करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना केले.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image