आदर्श मैत्रीचे स्मारक म्हणून गोपीनाथरावजी आणि विलासरावजीं यांचा एकत्रित पुतळा उभा करावा.

आदर्श मैत्रीचे स्मारक म्हणून गोपीनाथरावजी आणि विलासरावजीं यांचा एकत्रित पुतळा उभा करावा. 


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतिनिधी- व्यंकट पनाळे


लातुर : दि. १८ - जिल्हा परिषदेच्या दि. १६ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासरावजी देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा उभा करण्याचा सर्वानुमते एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी मनःपूर्वक स्वागत करुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह उपाध्यक्ष, सर्व सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य या सर्वांचे हार्दिक अभिनंदन ही केले आहे. 



विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे या दोघांची मैत्री सर्वांच्या साठीच एक आदर्श मैत्री आहे. यांच्या मैत्रीला कुठलीही बंधने अडवू शकले नाहीत. दो हंसो का जोडा राजकारणा बाहेरच्या अमृतमय मैत्रीचे प्रतीक म्हणूनच या जोडगोळी कडे पाहिले जाते. मैत्रीचे प्रतीकच नव्हे तर आदर्श मैत्रीचे स्मारक म्हणून या दोघांची वेगवेगळी पुतळे उभे करण्यापेक्षा दोघांचा एकत्रीत पुतळा उभा करावा. अतूट मैत्रीचा एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानला जाऊ शकतो. त्यादृष्टीने आपण या दोघांचा एकत्रित पुतळा उभा करावा. अशी पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे मागणी केली आहे. सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य यांना विश्वासात घेऊन एकत्रित पुतळ्याचा निर्णय घ्यावा. आपल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होईल एवढेच नव्हे तर या निर्णयाची गिनिज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल, असेही ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी म्हटलेले आहे.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image