रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे तसेच खा. सुनील तटकरे यांना निवेदन विक्रम मिनिडोर चालक मालकांना सरकार कडुन आर्थिक पॅकेज मिळावे ; विजय भाऊ पाटील यांची मागणी

रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे तसेच खा. सुनील तटकरे यांना निवेदन


विक्रम मिनिडोर चालक मालकांना सरकार कडुन आर्थिक पॅकेज मिळावे ; विजय भाऊ पाटील यांची मागणी


महाराष्ट्र 24 आवाज


पेण : मितेश जाधव



संपूर्ण जगात कोरोना विषाणू ने थैमना घातला आहे परंतु भरतात प्रवेश केल्यानतर केंद्र सरकारने कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले त्यामध्ये सर्व लहान मोठे उद्योग धंदे सरकारी तसेच खाजगी सेवा बंद करण्यात आली होती त्यामध्ये विक्रम मिनिडोअर चालक मालकांनचा देखील समावेश होता सर्व वाहन चालवणारे  रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनची  मुले व बेरोजगार तरुण आहेत नोकरीच्या अहभावी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा व्यवसाय स्वीकारला परंतु वाहन खरेदी करण्यासाठी बँकेचे कर्ज घेऊन  विक्रम मिनिडोअर  इको विकत घेतली परंतु लॉकडाऊन मुले कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी पैसे मिळत नसल्याने दैनंदिन कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे 



तसेच शासनाने 11 जून पासून 6 सीटर वाहनांमध्ये 4 प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी दिली परंतु परवडत नसल्याने वाहन मालक नाराजी व्यक्त करत आहेत तसेच रायगड जिल्ह्यात कोरोना  रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रवासी सुध्दा उपलब्ध होत नसल्याने विक्रम मिनिडोअर चालक मालकाची दु हेरी कात्री त सापडला आहे त्यामुळे 12 ते 13 हजार चालक मालकाची उपासमारीची वेळ आली आहे तसेच निवेदनात दिल्ली व आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री नि रिक्षा टॅक्सी चालक मालक यांना पॅकेज दिला तसेच महाराष्ट्र सरकारने विक्रम1 मिनिडोअर चालक मालकांना आर्थिक साहाय्य दयावे, आरटीओ ने वाहन पासींग मुदत तसेच कोणताच टॅक्स न आकारात 2 वर्ष वाढून ध्यावे तसेच MMRTA  क्षेत्रात वाहनांची वय मर्यादा 20 वर्ष वरून 25 वर्ष करावी व RTA क्षेत्रात वाहनांची  वय मर्यादा राज्यातील इतर जिल्हा प्रमाणे25 वर्षवरून 30 वर्ष करावी परंतु अशा गरीब कष्ट करी विक्रम मिनिडोअर चालक मालकना आर्थिक पॅकेज ध्यावे असे अध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनी ईमेल द्वारें मुख्यमंत्र्यांना


तसेच रायगड चे खाजदार सुनील तटकरे यांची विजय भाऊ यांनी भेट घेऊन आपल्या विक्रम मिनिडोअर चालक  मालकांची व्यथा मांडून आर्थिक पॅकेज मिळवून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच रायगडचे  पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेचे प्रश्न मार्गी लावावे व त्यांना न्याय मिळून द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image