सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे अंजनगाव तालुक्यात मोठे नुकसान बळीराज्यावर बोगस बियाण्या मुळे पुन्हा आर्थिक सावट... कृषी विभाग कुंभकर्णी निद्रेत..

सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे अंजनगाव तालुक्यात मोठे नुकसान


बळीराज्यावर बोगस बियाण्या मुळे पुन्हा आर्थिक सावट... 


कृषी विभाग कुंभकर्णी निद्रेत.. 


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतिनिधी - गजानन हुरपडे



अंजनगाव सुर्जी : अंजनगाव तालुक्यात सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की जून महिन्यात आलेल्या पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला आहे, परंतु शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे कृषी केंद्रा कडून विकत घेतले आणि त्या बियाण्याचा पेरा शेतात केला. परंतु चार-पाच दिवस झाल्यानंतरही सोयाबीन उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरू झाल्या आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते वैभव खारोळे यांनी सदर बाबीची गंभीर दखल घेतली असून त्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विश्रामगृहावर बोलावले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयाची मदत तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे वैभव खारोळे यांनी केली असून तीन दिवसाच्या आत नुकसानग्रस्त भागाची पाहणी न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा वैभव खारोळे व विठ्ठल ढोले यांनी दिला आहे.याप्रसंगी अशोकराव रोहनकर, विठ्ठल ढोले, गणेश महाजन, शुभम पटेल, प्रवीण पटेल आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत गंभीर प्रकारची कोणतीही दखल घेतली नसल्याचे समजते.



ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी आपली तक्रार, पावती सह तालुका कृषि कार्यालय पंचायत समिती अंजनगाव सुर्जी येथे लिखित स्वरूपात करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राठोड यांनी केले आहे .


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image