लाल परीच्या वाहकाची प्रवाशाला बस मधून उतरून देण्याची धमकी
महाराष्ट्र 24 आवाज
संजीव भांबोरे (उपसंपादक) भंडारा कडून पवनीकडे येत असलेल्या बस क्रमांक MH 11 BL 9215 ही बस पहेला या ठिकाणी दिनांक 27/6/ 2020 ला संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास पहेला येथून बसमध्ये 1 प्रवासी बसला असता त्यावेळी बसमध्ये एकून 20 प्रवासी बसले होते.
बसची मागील सीट व रस्ता खराब असल्यामुळे सदर प्रवासी मी उभाच राहतो असे वाहकाला सांगितले. परंतु सदर वाहकाने सदर प्रवाशांशी वाद घालून तिकीट काढून सुद्धा बेल मारून बस मधून उतरून देण्याची धमकी दिली.
प्रवाशांना वाहक अशी वागणूक देत असतील तर प्रवाशांनी कोणाच्या विश्वासावर लाल परीमध्ये प्रवास करायचा असा सामान्य नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे. 3 महिने बंद असलेल्या लालपरीमधून प्रवाशांना सुखरूप प्रवास करता येत नसेल तर प्रवाशासोबत हुज्जत घालणा-या अशा बस वाहकाला त्वरित निलंबित करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात येत आहे.