अंजनगाव सुर्जी शहरात प्रथम पॉझिटिव्हची नोंद
अंजनगाव प्रशासन सक्रिय....
प्रथम हिस्ट्री मध्ये तीस नागरिक संपर्कात...
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी - गजानन हुरपडे
अंजनगाव सुर्जी शहरातील एक 63 वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह मिळाला असून अमरावती येथील बेस्ट रुग्णालय येथे सध्या उपचार सुरु असल्याचे समजते. तो वृद्ध पेट्रोल पम्प वरील ट्रॅकर चालक असून अमरावती अकोला येथून अंजनगाव येजा करत असल्याची चर्चा लोकांमध्ये होती. तीन दिवसापूर्वी पासून उपचारासाठी अमरावती येथे असलेल्या त्या वृद्धाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आज आला. ज्यामुळे बिनधास्त असलेल्या स्थानिक प्रशासनात खळबळ माजली. काजीपुरा ते आलमचौक पर्येंतचा भाग सील करण्यात येणार असून प्रशासन त्या वृद्धाच्या संपर्कात असणाऱ्यांचा शोध घेत आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गेल्या पंधरा दिवसा पासून सुर्जी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. सरते शेवटी त्यास अमरावती येथे पाठविल्या गेले त्यामुळे त्या खासगी रुग्णालयास देखील सील करण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. त्या वृद्ध पॉझिटिव्ह इसमाचे संपर्कात असणाऱ्या नागरिकांनी स्वतः समोर येऊन आपली तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे जेणे करून गावाला ग्रहण लागणार नाही. बाहेरगावातून शेवटी अंजनगाव सुर्जी शहरात प्रसाद मिळालाच. आत्तापर्येंत कोणतेही महामारीचे सावट नसणाऱ्या अंजनगाव शहराला शेवटी गालबोट लागले. काझी पुरा येथील रस्ते सिल करणे ची कारवाही तहसिलदार विश्वनाथ घुगे, पोलीस निरीक्षक
राजेश राठोड, मुख्याधीकारी श्रीकुष्ण वाहुरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे, प्रशासकीय अधिकारी त्रिपुरारी, नप अभियंता व नोडल अधिकारी दिनेश ठेलकर, ऐ.पी.आय विशाल पोळकर, पोलिस उप निरीक्षक जावरे, पोलिस शिपाई श्रीकांत राठोड, नप कर्मचारी घोंगे, यांच्या उपस्थतीमध्ये होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पर्येंत केलेली उपाय योजना ज्यामुळे कोणताही प्रादुर्भाव झाला नाही. मात्र काही प्रमाणात प्रशासनाच्या झालेल्या चुका शहराला गालबोट लावून गेल्या. जसे राजमार्गावर वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या नोंदी प्रशासनाने फरताड़णी केल्या नाहीत. ज्यावेळी प्रशासन त्यांचे तपासणी साठी गेले त्यावेळी काही लोकांनी विरोधी सुरु लावला ज्यामुळे प्रशासन कोणतीच कार्यवाही कार्य शकले नाही. शेवटी वाहन चालकाने अंजनगाव शहरात प्रसाद आणला असल्याची चर्चा आहे.
*******************************
अंजनगांव शहरात आज दिनांक 22.06.20 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. शहरात ह्या महामारीचा प्रादुर्भाव होवू नये. शहर सुरक्षित राहावे. या दृष्टीने सर्व व्यापारी वर्गाने दक्षता ठेवण्याचे दृष्टीने व्यापार पेठ बंद ठेवणे योग्य होईल. प्रशासनाने व्यापार पेठ बंद करण्याचा निर्णय घेतल्यास सर्व व्यापारी बन्धुनि उचित सहयोग व सहकार्य देवून आपली प्रतिष्ठानें बंद ठेवून सहकार्य द्यावे व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी.
व्यापारी असो. अंजनगांव अध्यक्ष ब्रिजमोहन झंवर.