तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डाॅ. विनय देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डाॅ. विनय देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली


महाराष्ट्र 24 आवाज


प्रतिनिधी- श्रीकांत नांदगावकर 



तळा : द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे सदस्य डाॅ.विनय दत्तात्रय देशमुख यांचे दि.19/जून/2020 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले आहे. दि.20/जून/2020 रोजी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदीर , गो.म.वेदक विद्यामंदीर , पन्हेळी हायस्कुल , कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय या सर्व विद्याशाखेच्या वतीने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे सर्व नियम व शारिरीक अंतर ठेवून डाॅ.विनय देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पु.गो.मुळे , सचिव श्री मंगेशशेठ देशमुख,शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र कजबजे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे,मुख्याध्यापक श्री धुमाळ सर , पर्यवेक्षक श्री कदम सर ,सर्व विद्याशाखेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



डाॅ. विनय देशमुख यांच्या पश्चात त्यांची पत्नी डाॅ.नंदिनी देशमुख ,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.देशमुख हे बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या संस्थासाठी सल्लागार म्हणून कार्यरत होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी डाॅक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे.मत्स्य संशोधन आणि सागरी जीवशास्त्र या विषयातील ते तज्ज्ञ होते.केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेचे माजी प्रमुख म्हणून ते 14 वर्ष कार्यरत होते. कोळंबी , मत्स्यशेती या संदर्भातील त्यांच्या अभ्यासामुळे मच्छिमारांचा फायदा झाल्याचे सांगण्यात येते.त्यांनी देशाच्या किनारपट्टीचा अत्यंत सखोल अभ्यास केला. ते केंद्रसरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत सागरी मासेमारीसंर्भातील विविध समित्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image