तळा नगरपंचायतीला मिळणार वावे धरणातून पाणी नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजूरी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश

तळा नगरपंचायतीला मिळणार वावे धरणातून पाणी


नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजूरी


पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश


 


महाराष्ट्र 24 आवाज 


 


 प्रतिनिधी - श्रीकांत नांगावकर


अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.17 :- तळा नगरपंचायत हद्दीतील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी तसेच नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास आज शासनातर्फे मंजूरी मिळाली आहे. वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीला पाणीसाठा आरक्षित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 



  रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायत हद्दीत पाण्याचासाठा कमी असल्याकारणाने पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने नगरपंचायतीने मौजे वावे हवेली येथील लघु पाटबंधाऱ्यातून पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.     


 यासंदर्भात तळा नगरपंचायतीच्या वतीने लोकप्रतिनिधींनी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांची भेट घेवून समस्या मांडली होती. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे संबंधित विषयावर बैठक घेवून वावे लघुपाटबंधारे योजनेतून तळा नगरपंचायतीस पाणीसाठा उपलब्ध करून देण्याकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून मिळणेबाबत मागणी केली होती. 


या मागणीला अनुसरून आज तळा नगरपंचायतीस वावे लघुपाटबंधारे योजना, मौजे वावे-हवेली,ता. तळा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातून पाणी वापरासाठीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. नगरपंचायतीस नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने येथील जनतेच्या पाण्याची समस्या मिटणार आहे.


000000


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image