लातूर महानगरपालिका क्षेत्रातील ११ ते ५० वयातील रुग्णांचा आकडा मोठा. 'स्त्री रुग्णांपेक्षा पुरुषरुग्ण दुप्पट'

लातूर महानगरपालिका क्षेत्रातील ११ ते ५० वयातील रुग्णांचा आकडा मोठा.  


'स्त्री रुग्णांपेक्षा पुरुषरुग्ण दुप्पट' 


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतिनिधी - व्यंकटराव पनाळे


लातूर :- दि. ३० - कोरोना मुक्त लातूर महानगरपालिकेचा जयघोष करत करत लातूर महानगरपालिकेने कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या आकड्याचे शतक गाठले आहे. लातूर शहरात कोरोनाने प्रथम लेबर कॉलनीत घुसून प्रवेश मिळवला आणि हळूहळू चहूबाजूने गराडा टाकत टाकत शहराची बाजारपेठही ही पादाक्रांत केली. शहरातील वेगवेगळे नगर आणि अनेक काँलनी मध्ये कोरोनाचा प्रवास चालूच आहे. कोरोनामुक्त लातूर शहराची कोरोनाग्रस्त लातूर शहराकडे होत असलेल्या वाटचालीस नेमके जबाबदार कोण असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी मांडला आहे. आज पर्यंत लातूर शहरात महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ३४ स्त्री रुग्ण आणि ६६ पुरुष रुग्ण कोरणा पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रभाव हा लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यावर लवकर होतो असं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात लातूर महानगरपालिकेचा अहवाल पाहिल्यास हे चित्र उलटे पाहावयास मिळत आहे.  



लातूर महानगरपालिका क्षेत्रातील लहान मुले आणि वयोवृद्धा पेक्षा वय ११ ते ५० याच वयागटातील रुग्णांचा आकडा मोठा आहे. एकुण १०० पैकी वय ११ ते ५० या वयागटातील ६६ रूग्ण आहेत. तर वय ० ते १० या वयोगटातील ०५ रुग्ण आहेत. आणि वय ५१ च्या पुढील वयोगटातील २९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.


लातूर शहरातील कोरोनाचा वेग असाच चालू राहिला तर लातूर शहराची घोडदौड मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद च्या दिशेने वाटचाल करेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले आहे. त्यातच लातूर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेचे कोरोना योद्धे थकले असून नागरिकांनी आपापली जबाबदारी सांभाळून कोरोनाशी मुकाबला करावा असे सांगण्यात आले आहे. 


 


-- व्यंकटराव पनाळे, पत्रकार 


   ९४२२०७२९४८


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image