अंजनगाव सुर्जीत पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू तर एक महिला पॉझिटिव्ह काल त्या रुग्णास प्लाज्मा दिल्याची वार्ता... अंजनगाव शहरात एकूण 13 पॉझिटिव्ह तर एक मृत ज्यामुळे भीतीचे वातावरण.... स्थानिक प्रशासनात खळबळ..

अंजनगाव सुर्जीत पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू तर एक महिला पॉझिटिव्ह


काल त्या रुग्णास प्लाज्मा दिल्याची वार्ता... 


अंजनगाव शहरात एकूण 13 पॉझिटिव्ह तर एक मृत ज्यामुळे भीतीचे वातावरण.... 


स्थानिक प्रशासनात खळबळ..


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे


अंजनगाव सुर्जी शहरातील डब्बीपुरा येथील चवतीस वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असून तो 25 जून रोजी पॉझिटिव्ह असल्याचे समजले होते. तब्बल सात दिवस कोरोना महामारी सोबत लढा देऊन त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मोमीनपुरा येथील एक बत्तीस वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आहे ज्यामुळे शहरात आता तेरा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी एक मृत झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तो पॉझिटिव्ह रुग्ण व्याधीने ग्रस्त होता. इतकेच नसून त्याचे शरीरातील प्लाज्मा कमी झाल्याने काल एका डॉक्टरानी त्यास प्लाज्मा डोनेट केल्याचे समझते. मात्र त्या बत्तीस वर्षीय तरुणाच्या मृत्यू मुळे अंजनगाव शहरातील स्थानिक प्रशासनात मोठ्या प्रमाणात खळबळ झाली असल्याचे जाणवते.



अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयातुन आज पर्येंत 88 लोकांना थ्रोडस्लॅब साठी रेफर करण्यात आले होते. त्यापैकी तेरा लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर तीन लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समझते. मात्र ह्या निगेटिव्ह रिपोर्ट बाबद शासना जवळ कोणतीच माहिती नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यू मुळे अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या मृतक व्यक्तीच्या परिवातील त्याचा भाऊ, एक महिला, लहान मुलाचा समावेश पॉझिटिव्ह म्हणून आहे. तर सत्तर वर्षीय वृद्ध देखील पॉझिटिव्ह आहे. संपूर्ण परिवार त्या महामारीच्या विळख्यात ग्रासल्या गेली असून त्या महामारीचा प्रादुर्भाव देखील ह्या व्यक्ती च्या संपर्कात असणाऱ्या मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे समजते.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image