शेवटी तो कोव्हीड 19 संक्रमित मृतदेह अंजनगाव शहरात दाखल झालाच कसा? प्रेत घेऊन येणारी अॅम्ब्युलन्स प्रेत ठेऊन फरार. खड्डा खोदणाऱ्या मुलाच्या हाताने दफनविधी तो कोरोना बाधित मृतदेह दोन तास उघड्यावर स्मशानात जिल्हा व स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार गावाला ग्रहण लावणार ?

शेवटी तो कोव्हीड 19 संक्रमित मृतदेह अंजनगाव शहरात दाखल झालाच कसा?


प्रेत घेऊन येणारी अॅम्ब्युलन्स प्रेत ठेऊन फरार.


खड्डा खोदणाऱ्या मुलाच्या हाताने दफनविधी 


तो कोरोना बाधित मृतदेह दोन तास उघड्यावर स्मशानात 


जिल्हा व स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार गावाला ग्रहण लावणार ?


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतानिधी- गजानन हुरपडे



अंजनगाव सुर्जी शहरात नवीन वादाला तोंड फुटले असून जिल्हा व स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. काल तो कोव्हीड महामारीशी युद्ध करणारा चौतीस वर्षीय डब्बीपुरा येथील पॉझिटिव्ह नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने आलेल्या सुचनेनुसार त्या मृतदेहाच्या जातीय परंपरे नुसार अंतिम संस्काराची व्यवस्था लावली मात्र शहर वासियांना कोणतीही सूचना दिली नाही. तो मृतदेह कोणाच्या सांगण्यावरून अंजनगाव येथे आणण्यात आला? कोणाच्या सांगण्यावरून मुस्लिम स्मशानभूमीचे गेट उघडले? स्थानिक प्रशासना पैकी पोलीस प्रशासन व नगर पालिका प्रशासना व्यतिरिक्त कोणत्याही विभागाचा अधिकारी व कर्मचारी का नव्हता? प्रेत घेऊन येणारी रुग्णवाहिका प्रेत टाकून कशी निघून गेली? दफन विधी करण्यास दोन तासाचा अवधी का लागला? याबाबद माहिती गुलदस्त्यात आहे. मात्र प्रशासनाच्या बेकायदेशीर पणामुळे गावात नवीनच वाद उपस्तिथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


अमरावती कोव्हीड सेंटर मधून ते प्रेत कोणाच्या सांगण्यावरून बाहेर आणल्या गेले? अमरावती मध्येच ते प्रेत का अडविण्यात आले नाही? त्याचप्रमाणे अंजनगाव सुर्जी येथे प्रेत येणार ही सूचना कोणी दिली? हा प्रकार गैरकायदेशीर असून अंजनगाव शहराला ग्रहण लावणारा आहे. अंत्यविधीसाठी देखील त्या मृतकाचे नातेवाईक थांबले नाहीत. त्या नातेवाईकांना अंत्यविधीचे सोयरेसुतूक नव्हते मग हा मृतदेह अंजनगाव शहरात दाखल झालाच कसा? याची संपूर्ण चौकशी व्हावी. इतकेच नसून कोणतीही सूचना नसतांना त्या मृतदेहाच्या अंत्यविधी वेळी उपस्थित राहणाऱ्या स्थानिक प्रशासन कोणाच्या आदेशाने त्या स्मशानभूमीत व्यवस्थेला जुडले होते? त्याच प्रमाणे अंत्यविधीसाठी दोन तासा नंतर परवानगी कोणाच्या आदेशाने दिल्या गेली? ह्याची चौकशी अनिवार्य आहे. प्रशासनाने जातीय तेढ निर्माण करण्यास केलेले सहकार्य कितपत योग्य आहे ह्याची संपूर्ण चौकशी व्हावी. अन्यथा नवीन वाद उपस्थित होईल.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
विद्यार्थी व शिक्षकांसाठी 14 दिवस दिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी वाढली, जुने परिपत्रक रद्द
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, जालना जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोविड योध्दाने सन्मानित
Image