प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ , जनता टाइम्स व महाराष्ट्र 24 आवाज तर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र वितरण

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ , जनता टाइम्स व महाराष्ट्र 24 आवाज तर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र वितरण


महाराष्ट्र 24 आवाज


उपसंपादक - संजीव भांबोरे 



भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व जनता टाइम्स / जटा टीव्ही न्यूज नेटवर्क तसेच महाराष्ट्र 24 आवाज तर्फेग्रामपंचायत सभागृह अडयाळ येथे आज दिनांक 08 जुलै 2020 रोज बुधवारला कोरोना योद्धा सन्मान पत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा संपादक जनता टाइम्स /जटा TV न्यूज नेटवर्क मा.पंकज वानखेडे तर विशेष प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन अड्याळ मा. हरीचंद्र मोरे होते.



याप्रसंगी प्रमुख अतिथी मा.डॉ. जिभकाटे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय अड्याळ, सरपंच मा. सौ.जयश्री ताई कुंभलकर , सरपंच मा. मोहन घोगरे कलेवाडा , मा.नागदेवें सर ग्रामविकास अधिकारी अड्याळ, मा. संजीव भांबोरे वरिष्ठ उपसंपादक जनता टाइम्स/जटा tv तसेच महाराष्ट्र 24 आवाज , प्रशांत शहारे ,संघदेिप देशपांडे उपस्थित होते .




कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.


यावेळी कोरोना योद्धा म्हणून पोलीस उपनिरीक्षक हरीचंद्र मोरे, सरपंच जयश्री कुंभलकर, सरपंच मोहन घोगरे, डॉ. जिभकाटे , शैलेश उपासे तलाठी अड्याळ सर्कल ,भूषण मेश्राम पोलीस शिपाई , स्वरक्षण टीम अड्याळ, विकास फौंडेशन , संवाद फाऊंडेशन , मैत्री संघ यांना कोरोना योद्धा 2020 सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संघदीप देशपांडे , प्रास्तविक संजीव भांबोरे उपसंपादक तर आभार प्रदर्शन सरपंच मोहन घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी संवाद फाऊंडेशन चे दिपक मरघडे, अरुण देशमुख, संजोग ढवळे , अड्याळ स्वसंरक्षण टीम चे अमोल उराडे,अतुल मुलकलवार,विशाल रणदिवे,नरेंद्र (पिंटू)धकाते,राहुल खोब्रागडे, सोहेल खान,हेमंत शृंगारपावर,देवनाथ गभने,नितीन वरगंटीवार,जाबु शेख,निरंजन देवईकर,मनोज मुरकुटे,श्याम चौधरी, सोनु मानापुरे,राजु खंडाईत,संजय ब्राम्हणकर,छगन वासनिक,विक्की पचारे,बाबु पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.




मा.मोरे पो.उप निरीक्षक , मा. जिभकाटे वैद्यकीय अधीक्षक,सरपंच सौ जयश्री कुंभलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ,जनता टाइम्स टीम तसेच 


महाराष्ट्र 24 आवाज न्यूज नेटवर्क तर्फे सर्व सन्माननीय मान्यवरांना व सामाजिक कार्यकर्ते यांना पुढील उज्वल भविष्यासाठी व वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन...


 


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image