अंजनगाव स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा शहराला धोकादायक ठरणार महाराष्ट्र 24 आवाज जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे अंजनगाव सुर्जी : त्या अमोरा समोर निघालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरातील दुकाने सऱ्हास सुरु., कंटेनमेंट झोन केले निर्माण मात्र बफर झोनचे काय?

अंजनगाव स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा शहराला धोकादायक ठरणार


महाराष्ट्र 24 आवाज


जिल्हा प्रतिनिधी- गजानन हुरपडे


त्या अमोरा समोर निघालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरातील दुकाने सऱ्हास सुरु.... 



कंटेनमेंट झोन केले निर्माण मात्र बफर झोनचे काय? 


 


अंजनगाव सुर्जी प्रशासनाच्या गलथान कार्यभारामुळे शहरात कोरोना प्रादुर्भावाचा फैलाव होण्याचे संकेत दिसत असून गावाला संपूर्णतः वेठीस घेतल्या जाणार असल्याचे दिसत आहेत. दी. 15जुलै रोजी आलेल्या अहवाला नुसार नमूद पॉझिटिव्ह रुग्ण ज्याचा अंत्यविधी दोन दिवसापूर्वीच आटोपला होता. शासकीय स्थरावर थ्रोटस्लाब घेणाऱ्या त्या रुग्णालयातून ते प्रेत कोणतंही रिपोर्ट नसताना दिल्या गेले. अंजनगाव स्थानिक प्रशासनाचे निदर्शनास नसताना त्या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडल्या गेला. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्या महामारीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असताना अद्याप तू परिसर शासनाने सील केला नाही. इतकेच नसून त्या कंटेनमेंट झोन मधील दुकाने राजरोष पणे सुरु असून स्थानिक प्रशासनाचे त्यावर लक्ष नाही. एकाच भागात सकाळ सायंकाळी निघालेल्या त्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरास सील करण्यासाठी स्थानिक प्रशासन हतबल का? 



  दी 13 जुलै सोमवार दिवशी रात्री पाणअटाई भागातील बॅरिकेट्स काढणाऱ्या प्रशासनाने रस्ते मोकळे करण्याचे कोणतेही कारण नव्हते. ते बॅरिकेट्स काढताच त्याच भागातील गुलजारपुरा येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच चे सुमारास त्या पॉझिटिव्ह रुग्णांची मय्यत झाली व त्याच परिसरात मृत व्यक्ती पकडता दोन पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. ज्यामुळे कारण नसताना काढलेले बॅरिकेट्स पुन्हा स्थानिक प्रशासन लावण्यात येत असून आता पर्येंत चार वेळा त्याच परिसरात बॅरिकेट्स लावण्याचे काढण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत असल्याचे दिसत आहे. कंटेनमेंट झोन निर्माण केले असले तरी देखील बफर झोन अद्याप निर्माण केले नसून प्रशासन शेवटी आपले निर्णय का बदलावीत आहे? हे प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे. त्या पॉझिटिव्ह मृतकाच्या हिश्ट्री मधील संपर्कात येणाऱ्या लोकांची यादी देखील बनविण्यास प्रशासनास पराकोटीचे प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसत आहे.



प्रशासनाच्या कार्यात बाधा निर्माण करणाऱ्या काही बोटावर मोजल्या जाणाऱ्या लोकांवर अद्याप स्थानिक प्रशासनाने कोणताही गुन्हा का दाखल केला नाही हे विचाराधीन करण्यासारखे आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कोरोना महामारीस नाटक सांगणारे, स्थानिक प्रशासनास दीडलाख मिळतात म्हणून प्रशासन पॉझिटिव्ह रुग्ण दाखवीत आहेत म्हणणारे, हा कोरोना नाही साधी सर्दी ताप आहे म्हणून प्रशासनाची समाजात हसा उडविणाऱ्यावर गुन्हा का दाखल नाही हे समजण्या पलीकडे जात आहे. ज्यामुळे प्रशासन काही लोकांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन चार लोकांचा जमाव करून प्रशासनाच्या अंगावर जाणाऱ्या लोकांमुळे गावात महामारीचे थैमान माजेल की काय? असा संकेत दिसत आहे. ज्यावर जिल्हा प्रशासनाने वेळीच कार्यवाही करावी अन्यथा गावाचे भविष्य धोक्यात येईल.


Popular posts
सर्व वृत्तपत्रांना विनाअट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Image
तळा शहरात भव्य रक्तदान शिबीर ! तळा तालुक्यातील नागरिक, शासकीय व अशासकीय कर्मचा-यांना रक्तदान करण्याचे आवाहन.
Image
पत्रकारांना हात लावाल तर याद राखा- डी.टी.आंबेगावे उदगीर येथे तालुका कार्यालयाचे शानदार उदघाटन
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image