प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ रायगड जिल्ह्याच्या वतीने तळा पोलीस कोविड योद्धांचा सन्मान
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या ( शाखा रायगड) वतीने तळा पोलीस कोविड योद्धांचा दि.२४/जुलै रोजी सन्मान करण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर कोविड योद्धा सन्मान हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अनुशंगाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळा पोलीस ठाण्याला कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय. पदी नविनच नियुक्ती झालेल्या ए.मोहिते मॅडम यांचे देखील अभिनंदन करून संघटनेतर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पो.नि.एस.गेंगजे , पीएसआय ए.मोहिते मॅडम, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष जयप्रकाश पवार,जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर,तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार,तालुका संघटक नजीर पठाण, तालुका उपाध्यक्ष नितीन लोखंडे, तालुका सचिव नैनेश पाटील यांसह तळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.