प्रतिक सुर्यवंशी या विद्यार्थ्याचे इ. दहवीमध्ये घवघवीत यश भविष्यात आय.पी.एस. होण्याचा केला निर्धार

प्रतिक सुर्यवंशी या विद्यार्थ्याचे इ. दहवीमध्ये घवघवीत यश


भविष्यात आय.पी.एस. होण्याचा केला निर्धार 


महाराष्ट्र 24 आवाज



उपसंपादक- समीर बामुगडे


मुंबई : माध्यमिक शालांत परीक्षा 2020 इ. दहावीचा आॅनलाईन पद्धतीने बुधवारी निकाल जाहीर करण्यात आला असून ठाकूर शामनारायण हायस्कूल कांदिवली (पूर्व) मुंबई या विद्यालयचा विद्यार्थी कु. प्रतिक लक्ष्मण सुर्यवंशी यास दहावीमध्ये 88.40% गुण मिळाले असून या यशामध्ये ठाकूर शामनारायण विद्यालयाच्या प्रिन्सिपल मन्जेरी मॅडम, शिक्षक राठोड सर, जया मॅडम, मानसी मॅडम व सरस्वती क्लासचे हेमंत सर, आई-वडील , आजी-आजोबा व बहिणीचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिक सुर्यवंशी यांनी अतिशय मेहनतीने अभ्यास करून हे यश मिळवल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकला भविष्यात आय.पी.एस. अधिकारी होऊन देशसेवा करायची आहे, गरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत,महिला अत्याचार, बेरोजगारी, दहशतवाद, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा विविध प्रकारच्या समस्या भविष्यात मुळासकट नष्ट करायच्या असल्याने प्रतिकने आय.पी.एस. व्हायचे ठरवले आहे. दहावीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल महाराष्ट्र 24 आवाज च्या संपूर्ण टीमकडून प्रतिकचे हार्दिक अभिनंदन व आय.पी.एस.चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image