तळा तालुक्यात सापडला नवीन कोरोना पाॅझिटीव्ह
संख्या पोहचली २३ वर
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) तालुक्यातील पिटसईकोंड येथील ३६ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली आहे.हा इसम दि.४ रोजी अलिबाग येथे फिजिकल चेकअप साठी गेला होता.दि.७पासून त्याला सर्दी,ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने दि.१७ रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असता दि.१८ रोजी त्याचा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तसेच सदर व्यक्तीला होम आयसोलेशन करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तालुक्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या २३ झाली असून त्यातील १९ जण बरे होऊन घरी परतले आहेत तर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून २ बाधितांवर औषधोपचार सुरू आहे.कोरोना बधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने १२ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून लॉकडाऊन काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये,तसेच नेहमी मास्क चा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.