प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा इम्पॅक्ट API ने मागितली माफी पत्रकार अनिल राठोड यांना केली होती PSI ने अरेरावीची भाषा पत्रकारांना कोणी त्रास देत असेल तर खपवून घेणार नाही- संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा इम्पॅक्ट


 API ने मागितली माफी


 पत्रकार अनिल राठोड यांना केली होती PSI ने अरेरावीची भाषा


पत्रकारांना कोणी त्रास देत असेल तर खपवून घेणार नाही- संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी.


महाराष्ट्र 24 आवाज


प्रतिनिधी- अनिल राठोड
यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनचे PSI रामकिशन जायभाये यांना व्हाटस्अॅपवर प्रश्न विचारला असता PSI ने अरेरावीची भाषा केली होती ही बातमी संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांना समजताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे API श्री चव्हाण साहेब यांना फोन करून माहिती दिली आणि अरेरावीची भाषा करणा-या PSI ला निलंबीत करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर निषेध व निवेदन देऊन निलंबनासाठी पाठपुरावा करण्याची तयारी सुरू केली होती पण सदर पोलीस स्टेशनचे API श्री चव्हाण साहेब यांनी पत्रकार अनिल राठोड यांना अरेरावी करणा-या PSI च्या वतीने आज दि. 19 / 07 / 2020 रोजी यवतमाळ जिल्हा संघटनेच्या टीमसमोर माफी मागून मनांचा मोठेपणा दाखविल्यामुळे सदर प्रकरण थांबविण्यात आले आहे. यापुढे कोणत्याही ग्रुपवर सदर PSI चा  निषेध नोंदवू नये असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांनी केले आहे.



 _नोट_ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी किंवा सभासदांना कोणीही त्रास दिलेला खपवून घेतला जाणार नाही .
 
आंबेगावे डी.टी.
 संस्थापक अध्यक्ष 
 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य
मो. 9270559092 / 7499177411


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image