रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था - महाराष्ट्र २४ आवाज

रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था


महाराष्ट्र २४ आवाज


(तळा श्रीकांत नांदगावकर) रायगड जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन बाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढत चाललेला आकडा लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १५ जुलै च्या मध्यरात्रीपासून २६ जुलै पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले.



मात्र पाच दिवसातच लॉकडाऊन शिथिल करत किराणा, दूध, भाजीपाला, मटण, चिकन,मच्छी विक्रेते यांना सकाळी सहा ते अकरा या वेळेत आपली दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली व पुन्हा २३ जुलै रोजी नवीन आदेश जारी करून सकाळी सहा ते अकरा पर्यंत असलेल्या वेळेत बदल करून सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत वाढविण्यात आली यांसह पार्सल देण्याच्या अटीवर मद्यविक्रीस देखील परवानगी देण्यात आली.त्यामुळे नाराज झालेल्या इतर व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली.सर्व स्तरातून लॉकडाऊन बाबत रोष वाढल्याने तसेच लॉकडाऊन करूनही कोरोना बधितांचा आकडा वाढत असल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २४ जुलै लॉकडाऊन उठवत असल्याचे नवीन आदेश जारी करण्यात आले मात्र ही बातमी प्रसारमाध्यमांना उशिरा देण्यात आल्याने नागरिकांपर्यंत पोहचली नाही परिणामी घरातून बाहेर पडावे की नाही अत्यावश्यक सेवा देणारे दुकान सोडून इतर दुकानदारांनी आपली दुकाने उघडावी की नाही आणि, दुकाने सुरू व बंद करण्याची नक्की वेळ किती अशा अनेक गोष्टींवरून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था झाली असल्याचे पहायला मिळत आहे.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image